भारतात कधीकाळी 1 रुपयात मिळायचे 20 किलो गहू, 8 किलो तूप आणि…; ऐकून विश्वास बसणार नाही!

Published on -

कधीकाळी आपल्या आजी-आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी आज स्वप्नवत वाटतात. “5 पैशांना पाव मिळायचा”, “10 पैशात मजेदार खाद्यपदार्थ” किंवा “1 रुपयात संपूर्ण बाजार करून यायचे” हे वाक्य आपल्याला त्या काळाची एक झलक देतात. पण खरंच, त्या काळात 1 रुपयाचं इतकं मोठं मोल होतं की आज त्याची कल्पनाही करणे कठीण आहे. आज जिथे एका रुपयात फारतर प्लास्टिक पिशवी मिळेल, तिथे कधी काळी 20 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 8 किलो देशी तूप मिळत असे, हे ऐकून आपण नक्कीच थक्क होतो.

ब्रिटिश काळातील रुपयाचे मूल्य

ब्रिटीश राजवटीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था पूर्णतः इंग्रजांच्या ताब्यात होती. पण तरीही तेव्हा भारतीय चलनाची किंमत प्रचंड होती. 1900 च्या आसपास, 1 रुपयामध्ये एवढं रेशन मिळणं हे त्या काळातल्या जीवनशैलीवर आणि बाजारभावांवर प्रकाश टाकतं. त्याकाळी 1 रुपया म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी एक आठवड्याचं जगणं सहज शक्य होईल अशी रक्कम होती.

मजुराच्या आयुष्यातही 1 रुपयाचं स्थान फार मोठं होतं. एका दिवसाचं काम केल्यानंतर त्याला 25 पैसे म्हणजे 4 आणे मजुरी मिळायची. म्हणजेच, एका मजुराला 1 रुपया कमवण्यासाठी सलग 4 दिवस घाम गाळावा लागायचा. आणि अशा मेहनतीने मिळवलेला तो एक रुपया, इतका अमूल्य होता की त्यातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य व्हायचा.

यामागे आणखी एक मोठं कारण होतं, त्या रुपयाचं प्रत्यक्ष मूल्य. तेव्हा 1 रुपयाचं नाणं फक्त धातूचं नसून शुद्ध चांदीचं असायचं. 1835 साली ब्रिटिशांनी भारतात “नाणे कायदा” लागू केला, त्यानुसार 91.7% शुद्धतेचं आणि 11.66 ग्रॅम वजनाचं चांदीचं नाणं वापरात आणलं गेलं. म्हणजेच, त्या काळी रुपये हे केवळ चलन नव्हे, तर वस्तुमूल्य असलेलं संपत्तीचं प्रतीक होतं.

आजच्या 1 रुपयाचे मूल्य

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर यांचं मूल्य एकसमान होतं. 1 रुपया = 1 डॉलर. आज जिथे 1 डॉलरसाठी 86 पेक्षा अधिक रुपये खर्चावे लागतात, तिथे तो काळ आठवला की चलनमूल्याच्या घसरणीची तीव्रता समजते. रुपयाच्या या अधोगतीमागे अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारणं आहेत, पण त्यात ब्रिटिशांच्या नंतरचा चलन नियंत्रणाचा हस्तक्षेपही एक मोठं कारण होतं.

आज आपण डिजिटल पेमेंट, UPI, कार्ड्स वापरतो आणि 1 रुपयाचं नाणं एखाद्या कोपऱ्यात पडून राहिलं तरी फारसं लक्ष देत नाही. पण ज्या काळात 1 रुपयाची किंमत जीवन बदलवणारी होती, त्या काळाच्या आठवणी अजूनही आपल्या वयोवृद्ध घरच्यांच्या बोलण्यात जिवंत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!