दक्षिण दिशेचा योग्य वापर केला की मिळते अपार संपत्ती, श्रीमंत लोकांचा गुपित वास्तु उपाय उघड!

Published on -

घर म्हटलं की फक्त भिंती आणि छत नव्हे, तर तिथे असते एक उबदारपणाची जागा, जिथं सुख, समाधान आणि समृद्धी वसत असते. आणि ही समृद्धी अनेकदा नुसती मेहनतीवर नाही, तर घरातल्या उर्जेच्या प्रवाहावरही अवलंबून असते. आपल्या भारतीय परंपरेत वास्तुशास्त्राला यासाठी मोठं महत्त्व दिलं जातं. या शास्त्रानुसार, घरातील प्रत्येक दिशेला स्वतःचं वैशिष्ट्य असतं. त्यापैकी एक विशेष दिशा म्हणजे, दक्षिण दिशा.

बऱ्याच लोकांना वाटतं की दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून केवळ अशुभ असते. पण वास्तुशास्त्र सांगतं की हीच दिशा जर समजून वापरली, तर ती तुमच्या घरात धनसंपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा खेचून आणू शकते. म्हणूनच श्रीमंत लोक त्यांच्या घराच्या दक्षिण दिशेला काही खास गोष्टी ठेवतात आणि हे केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर अनुभवाने सिद्ध झालेला विश्वास म्हणून.

तिजोरी किंवा लॉकर

या दिशेला तिजोरी किंवा लॉकर ठेवणं हा एक प्रमुख वास्तु उपाय मानलंला जातो. मात्र त्यासाठी एक अट असते, तिजोरीचं तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावं. असं केल्याने घरात येणारा पैसा नुसता टिकतच नाही, तर अनावश्यक खर्च टाळून आर्थिक स्थैर्यही वाढतं.

लक्ष्मी आणि गणेश मूर्ती

दक्षिण दिशेच्या महत्वाचं आणखी एक गूढ आहे, लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती. ही दोन्ही दैवते एकत्र ठेवली की त्या जागेवर सुख, शांती आणि धनधान्याचा वर्षाव होतो, असं मानलं जातं. या मूर्ती केवळ पूजेसाठी नसतात, तर त्या एक प्रकारे सकारात्मक उर्जेचं केंद्र बनतात.

चांदीची किंवा तांब्याची नाणी

श्रीमंत लोक त्यांच्या घरात लाल किंवा पिवळ्या कापडात चांदीची किंवा तांब्याची नाणी गुंडाळून ठेवतात. हे पाहायला साधं वाटेल, पण यामागं आहे एक सूक्ष्म उर्जा जागृत करण्याचा प्रयत्न. हे नाणे वास्तुशास्त्रानुसार समृद्धीचे चुंबक म्हणून काम करतं.

मौल्यवान वस्तु

पैसे, दागिने, कागदपत्रे अशा मौल्यवान गोष्टी दक्षिण दिशेला ठेवाव्यात असं सांगितलं जातं. यामागचं तत्त्वज्ञान साधं आहे. संपत्ती ज्या दिशेने सुरक्षित राहते, त्या दिशेने यशाचा दरवाजाही उघडतो. त्यामुळेच बऱ्याचशा श्रीमंत घरांमध्ये दागिन्यांचा लॉकर किंवा महत्वाच्या फाईल्सचा कपाट याच दिशेला असतो.

‘फिनिक्स’ पक्ष्याची मूर्ती

एक अत्यंत रंजक आणि भावनात्मक गोष्ट म्हणजे ‘फिनिक्स’ पक्ष्याची मूर्ती दक्षिण दिशेला ठेवणं. हा पक्षी स्वतः आगीत जळून, पुन्हा राखेतून जन्म घेतो म्हणजेच नवी सुरुवात, नवी आशा. घरात अशा प्रतीकेचा अर्थ असतो, कुठल्याही अडचणीतून पुनर्जन्म घेण्याची ऊर्जा.

अगदी साधा, रोजच्या वापरातला एक भाग म्हणजे झाडू. पण वास्तुशास्त्र सांगतं, की झाडू दक्षिण दिशेला ठेवणं नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी उपयुक्त असतं. ही छोटीशी सवय घरात शांती आणि स्थैर्य राखू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!