थायलंड आणि कंबोडिया हे भारतीय पर्यटकांच्या यादीत नेहमीच टॉपवर असलेले देश. स्वस्त प्रवास, सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळं, आणि भारताशी असलेली सांस्कृतिक नाळ यामुळे हे दोन्ही देश भारतातून प्रवास करणाऱ्यांसाठी कायम आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. पण सध्या दोन्ही देशांमध्ये सीमावादामुळे लष्करी संघर्ष सुरू असतानाही अनेकांच्या मनात एकच प्रश्न आहे, अशा परिस्थितीत 100 भारतीय रुपयांचं तिथे नेमकं किती मूल्य आहे?

कंबोडिया आणि थायलंडमधील तणाव
कंबोडिया आणि थायलंड हे देश सध्या एकमेकांवर कुरघोडी करत असून सीमावादाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढलेला आहे. कंबोडियाने संयुक्त राष्ट्रांकडे पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या संघर्षामुळे या देशांत प्रवास करताना सुरक्षिततेचा विचार करावा लागत आहे. तरीही, शांतीची आशा ठेवून अनेक पर्यटक तिकडे जाण्याची योजना आखतात.
थायलंड आणि कंबोडिया या दोघांचे भारताशी संबंध केवळ राजनैतिक किंवा आर्थिक नव्हे, तर धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवरही खोलवर रुजलेले आहेत. बौद्ध धर्म, हिंदू मंदिरं, आणि परंपरेतील साम्य यामुळे हे देश भारतीयांना खूप जवळचे वाटतात. त्यामुळे भारतातून हजारोंच्या संख्येने पर्यटक दरवर्षी तिकडे जातात.
भारतीय रुपयाचे मूल्य
आता मुख्य मुद्द्यावर येऊया, येथे भारतीय 100 रुपयांचं किती मूल्य आहे? तर कंबोडियामध्ये स्थानिक चलन म्हणजे “रियल”. सध्या 100 भारतीय रुपये सुमारे 4,622 कंबोडियन रियल इतके होतात. दुसरीकडे, थायलंडचं अधिकृत चलन म्हणजे “थाई बाट”, आणि 100 भारतीय रुपये हे सुमारे 37.34 थाई बाट इतके होतात.
हे मूल्य ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं, पण त्यामुळेच या देशांमध्ये भारतीय रुपयांची खरेदीशक्ती काहीशी जास्त भासते. मात्र, हे विनिमय दर नेहमी बदलत असतात, त्यामुळे प्रत्यक्ष प्रवासाच्या आधी त्याचा तपास घेणे आवश्यक आहे.
सध्या संघर्षामुळे हे ठिकाण थोडं धोकादायक असलं, तरी शांतता प्रस्थापित झाल्यानंतर ही दोन्ही ठिकाणं पुन्हा पर्यटकांनी फुलून जातील, यात शंका नाही. तुम्हीही कधीतरी या देशांचा अनुभव घेण्याचं स्वप्न बघत असाल, तर भारतीय रुपयांचं तिथे काय मूल्य आहे हे आधी समजून घ्या, यामुळे तुम्हाला तुमचं बजेट ठरवायला उपयोगी ठरेल.