नागरिकांना उगाच चकरा मारायला लावू नका, कागदपत्रे पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्या, आमदार काळेंच्या सूचना

Published on -

कोपरगाव-“ज्या योजनांसाठी जे पात्र असतील, त्यांचेच अर्ज भरा. गरज नसताना कोणालाही चकरा मारायला लावू नका. कार्यकर्त्यांनी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी समाजातील गरजवंत, पात्र लाभार्थी शोधून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा” अशा ठाम सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या.

कोळपेवाडी येथील सुरेगाव महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवार, २५ जुलै रोजी आयोजित समाधान शिबिरात आमदार काळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर होते.

आमदार काळे म्हणाले की, “महायुती शासन हे सर्वसामान्य जनतेचे आहे. शासनाला समाजाच्या अडचणींची पूर्ण जाण असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. अनेक नागरिक योजना पात्र असूनही आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे लाभ मिळवू शकत नाहीत. म्हणूनच ‘समाधान शिबिर’ हे शासनाचे थेट जनतेशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिबिरादरम्यान नागरिकांना विविध दाखले व योजना अनुदानाचे वाटप आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, भूमी अभिलेख अधिकारी रमाकांत डावरे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, संभाजीराव काळे, दिलीपराव चांदगुडे, सरपंच चंद्रकला कोळपे, उपसरपंच शितल कोळपे, ग्रामपंचायत सदस्य तसेच सोमनाथ चांदगुडे, दिलीप चांदगुडे, सुभाष गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुरेगाव मंडळातील सुरेगाव, मढी बु., मढी खु., देर्डे चांदवड, कोळपेवाडी, शहाजापूर, कोळगाव थडी, मंजूर, हंडेवाडी, वेळापूर, कारवाडी, चास नळी, वडगाव, बक्तरपूर, माहेगाव देशमुख आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!