Maharashtra Expressway : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाचे अर्थव्यवस्था सध्या जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी आगामी काळात भारताचे अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास व्यक्त केलाय. खरे तर कोणत्याही देशाच्या विकासात तेथील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी सर्वात महत्त्वाची भूमिका निभावत असते.
आपल्या देशाच्या विकासात देखील देशातील रस्त्यांचे नेटवर्क अगदीच महत्वाची भूमिका निभावत असून आज आपण भारतातील 63 लाख किलोमीटर लांबीच्या रस्ते नेटवर्कची माहिती पाहणार आहोत. आता आपण देशातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्गांचे नेटवर्क असलेल्या टॉप 10 राज्यांबद्दल जाणून घेऊयात.

‘ही’ आहेत भारतातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणारे टॉप 10 राज्य !
ओडिशा : या यादीत ओडिशा या राज्याचा 10वा नंबर लागतो. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशामध्ये 5,897 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गाचे नेटवर्क तयार करण्यात आले आहे. 2014 नंतर ओडिशा मधील रस्त्यांचे नेटवर्क जलद गतीने वाढले आहे.
बिहार : भारतातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या टॉप 10 राज्यांमध्ये बिहार या राज्याचा नववा नंबर लागतो. जुन 2025 अखेरपर्यंत बिहारमध्ये 5,969 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांचे नेटवर्क तयार करण्यात आले आहे.
तामिळनाडू : या यादीत तामिळनाडू या राज्याचा आठवा नंबर लागतो. जून 2025 अखेरपर्यंत तामिळनाडूमध्ये 7000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गाचे नेटवर्क तयार करण्यात आले आहे.
गुजरात : भारतातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या टॉप 10 राज्यांमध्ये गुजरात या राज्याचा सातवा नंबर लागतो. गुजरातमध्ये सध्या स्थितीला 8 हजार 111 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गाचे नेटवर्क आहे.
कर्नाटक : या यादीत कर्नाटकाचा देखील नंबर लागतो. कर्नाटक मध्ये 8191 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गाचे नेटवर्क आहे. कर्नाटकचा या यादीत सहावा नंबर लागतो.
आंध्र प्रदेश : भारतातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या टॉप 10 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा पाचवा क्रमांक लागतो. आंध्र प्रदेश मध्ये 8683 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क कार्यरत आहे.
मध्यप्रदेश : या यादीत मध्य प्रदेश या राज्याचा चौथा क्रमांक लागतो. मध्यप्रदेश राज्यात 9105 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क कार्यरत आहे.
राजस्थान : या यादीत राजस्थानी या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये दहा हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क कार्यरत आहे.
उत्तर प्रदेश : देशातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या टॉप 10 राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश मध्ये 12270 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क तयार करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा नंबर कितवा?
देशातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या टॉप 10 राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. 2022 च्या nhai.gov.in नुसार, भारताच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान आपल्या महाराष्ट्राचे आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत फार मोठी आहे.
देशाच्या एकूण विकासात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क देखील आपल्या महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रात 18,459 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क आहे.