निवृत्तीनंतरही दरमहा कमवा 1 लाख रुपये, SWP गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला नक्की समजून घ्या!

Published on -

महागाईच्या झळा वाढत असताना, एक असा विचार मनात घोळतो की, जर आपण लवकर निवृत्त झालो, तर महिन्यागणिक खर्च कसा चालवायचा? आपल्यातले कितीतरी लोक, वयाच्या 50 व्या वर्षी नोकरीपासून मोकळे व्हायचे स्वप्न बघतात. पण त्यासाठी गरज असते एका ठोस, शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची. याच पार्श्वभूमीवर एक योजना सध्या गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे, ती आहे SWP योजना म्हणजेच ‘सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’. ही एक अशी योजना आहे जी केवळ तुमच्या आजच्या बचतीचं मूल्य वाढवत नाही, तर भविष्यात तुम्हाला दरमहा नियमित उत्पन्न मिळवून देऊ शकते.

काय आहे SWP योजना?

SWP ही म्युच्युअल फंडातील अशी योजना आहे जिथे एकरकमी गुंतवणुकीनंतर तुम्ही ठराविक कालावधीत ठराविक रक्कम नियमितपणे परत मिळवू शकता. म्हणजेच, ही योजना तुम्हाला दरमहा ‘पगार’ मिळवून देते, तेही नोकरी न करता. यासाठी सर्वात आधी गरज असते ती शिस्तबद्ध SIP, म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची. जर तुम्ही 25 व्या वर्षी दरमहा 10,000 रुपयांचा SIP सुरू केला आणि सरासरी 12% परतावा दर गृहीत धरला, तर वयाच्या 50 व्या वर्षी तुमच्याकडे सुमारे 1.90 कोटी रुपयांचा निधी तयार होऊ शकतो.

हा निधी तुम्ही SWP योजनेमध्ये गुंतवलात, तर पुढच्या 20 वर्षांसाठी तुम्ही दरमहा 1 लाख रुपये नियमितपणे काढू शकता, तेही गुंतवणुकीचं मूळ वाढवत ठेवत. या काळात तुमच्या फंडाचे एकूण मूल्य जवळपास 6.27 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. ही रक्कम तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी एक मजबूत आधार बनू शकते, ज्यामुळे तुम्हाला वयाच्या 50 नंतरही कोणत्याही आर्थिक विवंचनेशिवाय आयुष्य जगता येईल.

ही योजना त्यांच्यासाठी खास आहे, ज्यांना एकरकमी रक्कम मिळाली आहे एखाद्या व्यवसाय विक्रीनंतर, पेन्शन, रिटायरमेंट बेनिफिट्स किंवा अन्य स्रोतांतून. ते हे पैसे कमी जोखमीच्या योजनांमध्ये गुंतवतात आणि हळूहळू, नियोजित स्वरूपात त्यातून पैसे परत घेतात. ही संकल्पना आपल्या परंपरागत एफडी, पेन्शन प्लॅनपेक्षा अधिक लवचिक आणि परताव्याच्या दृष्टीने फायदेशीर मानली जाते.

‘शिस्तबद्ध गुंतवणूक’ महत्वाची

SWP योजनेचा खरा गाभा आहे ‘शिस्तबद्ध गुंतवणूक’. या प्रवासात सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे नियमितपणे गुंतवणूक करणे आणि त्यातून पैसे काढण्याच्या वेळा पाळणे. एकदाही या शिस्तीत खंड पडल्यास, अंतिम परिणामावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. SWP योजनेत एकदा गुंतवणूक केल्यानंतर दरमहा निश्चित तारखेला ठराविक रक्कम परत मिळते, पण या गुंतवणुकीतून मधल्या काळात पैसे काढता येत नाहीत, त्यामुळे दीर्घकालीन नियोजन आणि संयम खूप महत्त्वाचा ठरतो.

प्रसिद्ध SWP म्युच्युअल फंड योजना

सध्या भारतात काही SWP म्युच्युअल फंड योजना विशेषतः चांगली कामगिरी करत आहेत. उदाहरणार्थ, HDFC हायब्रिड इक्विटी फंड, ICICI प्रु बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड, SBI मॅग्नम बॅलन्स्ड फंड, आदित्य बिर्ला SL बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड, आणि DSP इक्विटी अँड बॉन्ड फंड. या सर्व योजना दीर्घकालीन परिपक्वतेसाठी योग्य असून, त्यांचा परतावा आणि जोखीम नियंत्रणाचा इतिहास चांगला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!