अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! शिर्डी ते तिरुपती दरम्यान चालवली जाणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रक पहा….

तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात मोठे आणि करोडो लोकांचे श्रद्धास्थान. साईनगरी शिर्डी हे देखील देशभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरम्यान रेल्वेने या दोन्ही श्रद्धास्थानादरम्यान विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे.

Published on -

Shirdi – Tirupati Railway : महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की रेल्वेने शिर्डी ते तिरुपती दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र तिरुपतीला जातात.

तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वाधिक मोठे मंदिर आणि करोडो हिंदू लोकांचे श्रद्धास्थान आहे. जगभरातील हिंदू सनातनी लोक तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी या मंदिरात गर्दी करत असतात. तिरुपती बालाजी मंदिरात उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आणि सणासुदीच्या दिवसांमध्ये भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असते.

रेल्वे कडून महाराष्ट्रातून तिरुपती बालाजी साठी वेगवेगळ्या रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. तिरुपती बालाजी साठी महाराष्ट्रातून नियमित रेल्वे गाड्या चालवल्या जातात. याशिवाय काही विशेष गाड्या देखील सोडल्या जात आहेत.

शिर्डी ते तिरुपती दरम्यान देखील विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रेल्वे विभागाकडून शिर्डी ते तिरुपती बालाजी दरम्यान विशेष गाडीच्या एकूण 18 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 

कसे राहणार विशेष एक्सप्रेसचे वेळापत्रक 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी साईनगरी शिर्डी ते तिरुपती दरम्यान विशेष गाडी चालवली जाईल. या विशेष गाडीच्या शिर्डी ते तिरुपती अशा नऊ आणि तिरुपती ते शिर्डी अशा नऊ फेऱ्या होणार आहेत.

तिरुपती साईनगरी शिर्डी विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 07637) 3, 10, 17, 24, 31 ऑगस्ट आणि 7 14 21 आणि 28 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या प्रत्येक रविवारी तिरुपती रेल्वे स्थानकावरून सकाळी चार वाजता सोडली जाणार आहे आणि सोमवारी ही गाडी शिर्डी रेल्वे स्थानकावर सकाळी दहा वाजून 45 मिनिटांनी पोहोचणार आहे.

तसेच साईनगर शिर्डी तिरुपती विशेष गाडी म्हणजेच गाडी क्रमांक 07638 ही विशेष गाडी 4, 11, 18, 25 ऑगस्ट आणि 1, 8, 15, 22 आणि 29 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या प्रत्येक सोमवारी साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 19:35 वाजता तिरुपतीच्या दिशेने रवाना होणार आहे आणि ही गाडी बुधवारी मध्ये रात्री 1:30 वाजता तिरुपती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!