आधारचे किती प्रकार आहेत? UIDAI कडून मिळतात ‘हे’ 4 फॉरमॅट, कुठे कोणता वापरायचा ते जाणून घ्या!

Published on -

आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी केवळ ओळखीचा पुरावा न राहता, अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी अत्यावश्यक दस्तऐवज बनलं आहे. मोबाईल सिम घेताना, बँकेत खाते उघडताना, सरकारी योजनेचा लाभ घेताना किंवा अगदी प्रवासातसुद्धा ओळख पुरवण्यासाठी आधार कार्ड लागतो. पण बहुतेकांना हे माहीत नसतं की आधार कार्डाचे वेगवेगळे चार प्रकार अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक फॉरमॅटचा वापर विशिष्ट गरजेनुसार केला जातो.

आधार पत्र

UIDAI कडून पोस्टाद्वारे पाठवलं जाणारं हे पारंपरिक लॅमिनेटेड कागदी कार्ड आहे. यात QR कोड आणि तुमची मूलभूत माहिती असते. सरकारी फॉर्म, सामान्य व्यवहार आणि सरकारी योजनांसाठी हे कार्ड पुरेसं असतं.

PVC आधार कार्ड

हे एटीएम कार्डसारखं दिसणारं मजबूत प्लास्टिकचं कार्ड आहे, जे सहज फाटत नाही. त्यात डिजिटल स्वाक्षरी, QR कोड आणि फोटो असतो. बँकिंग कामांसाठी किंवा अधिकृत ओळखपत्र म्हणून याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो.

mAadhaar

UIDAI द्वारे तयार केलेलं हे अधिकृत मोबाइल अॅप आहे. यात तुमचा आधार प्रोफाइल QR कोडसह सेव्ह केला जातो. रेल्वे किंवा विमानतळावर ओळखपत्र म्हणून याचा वापर करता येतो. सतत आधार सोबत ठेवण्याची गरज नसल्यामुळे हे पर्याय अधिक सोयीस्कर आहे.

ई-आधार

हे पासवर्ड-संरक्षित पीडीएफ स्वरूपातलं कार्ड आहे, जे UIDAI च्या वेबसाइटवरून मोफत डाउनलोड करता येतं. यात डिजिटल स्वाक्षरी आणि QR कोड असतो. डिजिटल कामांसाठी आणि तातडीच्या गरजांसाठी हे फार उपयोगी ठरतं. आधार अपडेट झाल्यानंतरही नवीन ई-आधार लगेच मिळतो.

तुम्ही जर सरकारी योजना किंवा शाळा-कोलेजच्या फॉर्मसाठी आधार वापरत असाल, तर आधार पत्र किंवा ई-आधार पुरेसं ठरतं. बँकेत किंवा ऑफिसमध्ये दाखवण्यासाठी पीव्हीसी आधार कार्ड चांगलं मानलं जातं. प्रवास करताना mAadhaar अधिक सोयीचं ठरतं. डिजिटल स्वरूपात आधार पाहिजे असल्यास ई-आधार सर्वोत्तम पर्याय आहे.

तुमच्या गरजेनुसार योग्य आधारचा पर्याय निवडणं हेच शहाणपणाचं ठरतं. यामुळे तुमचं काम अधिक सहज, सुरक्षित आणि जलद होतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!