Worlds Safest City : नुम्बेओची 2025 मधील सर्वाधिक सुरक्षित देशांची आणि सर्वाधिक सुरक्षित शहरांची यादी समोर आली आहे. दरम्यान या संस्थेच्या 2025 च्या नवीनतम डेटाच्या आधारे जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? या यादीनुसार भारतातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे कोणती ? यात महाराष्ट्रातील किती शहरांचा समावेश आहे ? याचीच माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
ही आहेत जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरे
अबुधाबी : Numbeo च्या इंडेक्सनुसार मध्य पूर्वेतील अबुधाबी हे शहर जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. या यादीत या शहराचा पहिला नंबर लागतो. खरंतर Numbeo च्या इंडेक्समध्ये 279 शहरांचा समावेश आहे. या 279 शहरांमध्ये अबुधाबी हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. या शहराचा सुरक्षा निर्देशांक स्कोर 88.8 आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सलग नवव्या वर्षी या शहराने या यादीत पहिले स्थान कायम ठेवले आहे.

दोहा, कतार : कतार मधील दोहा हे जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येते. या शहराचा सेफ्टी इंडेक्स 84.3 इतका आहे.
दुबई, संयुक्त अरब अमिराती : संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई हे शहर पर्यटनासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. हे शहर पर्यटनासाठी लोकप्रिय आहेच शिवाय हे शहर पूर्णपणे सुरक्षित देखील आहे. हेच कारण आहे की जगातील सर्वाधिक सुरक्षित देशांच्या यादीत या शहराचा तिसरा क्रमांक लागतो. या शहराचा सेफ्टी इंडेक्स 83.9 इतका आहे.
शारजाह, संयुक्त अरब अमिराती : संयुक्त अरब अमिरातीचे आणखी एक शहर म्हणजेच शारजाहा देखील या यादीत आहे. 83.7 सेफ्टी इंडेक्ससह हे शहर या यादीत चौथ्या क्रमांकावर येते.
तैपेई, तैवान : हे शहर जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर येते. या शहराचा सेफ्टी इंडेक्स म्हणजेच सुरक्षा निर्देशांक 83.6 इतका आहे.
मनामा, बहरीन : बहरीन देशातील मनामा हे शहर जगातील सर्वाधिक सुरक्षा शहरांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर येते. या शहराचा सुरक्षा निर्देशांक 81.3 इतका आहे.
मस्कत, ओमान : ओमान देशातील मस्कत हे शहर देखील जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत येते. या यादीत हे शहर सातव्या क्रमांकावर असून या शहराचा सुरक्षा निर्देशांक 81.1 इतका आहे.
द हेग (डेन हाग), नेदरलँड्स : नेदरलँड मधील हे शहर 80.0 सेफ्टी इंडेक्स या यादीत आठव्या क्रमांकावर येते. जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरांच्या यादीत या शहराचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
ट्रॉन्डहाइम, नॉर्वे : नॉर्वे या देशातील हे शहर जगातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 10 शहरांच्या यादीत नवव्या क्रमांकावर येते. या शहराचा सुरक्षा निर्देशांक 79.3 इतका आहे.
आइंडहोव्हन, नेदरलँड्स : नेदरलँड या देशातील आणखी एक शहर या यादीत समाविष्ट आहे. आइंडहोव्हन हे शहर 79.1 सेफ्टी इंडेक्ससह या यादीत 10 व्या क्रमांकावर येते.
भारतातील सर्वाधिक सुरक्षित शहरे
अहमदाबाद : Numbeo इंडेक्सच्या जागतिक क्रमवारीनुसार अहमदाबाद 77 व्या क्रमांकावर येते. याचा सेफ्टी इंडेक्स 68.6 इतका आहे. मात्र या यादीनुसार हे शहर भारतातील सर्वाधिक सुरक्षित शहर बनले आहे.
जयपूर : हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. या शहराचा सेफ्टी इंडेक्स 65.2 आहे आणि जागतिक क्रमवारीत हे शहर 96 व्या क्रमांकावर आहे.
कोयंबटूर : जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत या शहराची रँकिंग 112 आहे. मात्र हे भारतातील सर्वाधिक सुरक्षा शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येते. याचा सेफ्टी इंडेक्स 62 इतका आहे.
चेन्नई : जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत या शहराची रँकिंग 123 इतकी आहे. सेफ्टी इंडेक्स 60.3 इतका आहे. मात्र या यादीनुसार हे देशातील सर्वाधिक सुरक्षित चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.
पुणे : भारतातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत पुण्याचा पाचवा नंबर लागतो. या शहराचा सेफ्टी इंडेक्स 58.7 इतका आहे आणि ग्लोबल रँकिंग 129 इतकी आहे.
हैदराबाद : जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत या शहराचे रँकिंग 139 इतकी आहे. याचा सेफ्टी इंडेक्स 57.3 आहे. पण हे शहर भारतातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत सहाव्या नंबरवर आहे.
मुंबई : या यादीत महाराष्ट्रातील आणखी एका शहराचा समावेश होतो. मुंबई हे जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत 145 व्या स्थानी आहे आणि याचा सेफ्टी इंडेक्स 55.9 इतका आहे. मात्र हे देशातील सातव्या क्रमांकाचे सर्वाधिक सुरक्षित शहर आहे.
कोलकाता : हे भारतातील आठव्या क्रमांकाचे सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत या शहराचा 166 वा नंबर आहे. या शहराचा सेफ्टी इंडेक्स 53.3 इतका आहे.
गुरुग्राम : जगातील सर्वाधिक सुरक्षा शहरांच्या यादीत हे शहर 209 व्या स्थानी आहे. या शहराचा सुरक्षा निर्देशांक 46 इतका आहे. पण हे देशातील नवव्या क्रमांकाचे सर्वाधिक सुरक्षित शहर आहे.
बेंगळुरू : जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांच्या यादीत या शहराचे रँकिंग 211 इतकी आहे. या शहराचा सेफ्टी इंडेक्स 45.7 इतका आहे. मात्र हे देशातील दहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक सुरक्षित शहर आहे.