व्हीआयपी बंगल्यात घुसलेल्या बकऱ्यास पोलिस कोठडीची हवा

Ahmednagarlive24
Published:

मुरैना : पाेलिस ठाण्यात चाेर-गुंड आदींना कोठडीत ठेवले जाते, हे एकले असेल. परंतु मध्य प्रदेशातील मुरैना शहर पाेलिस ठाण्यात एका बकऱ्याला रात्रभर पोलिस ठाण्याची हवा खावी लागली.

या बकऱ्याचा दोष इतकाच होता की, एका व्हीआयपीच्या बंगल्यात घुसण्याचा गुन्हा त्याने केला होता. सकाळी बकऱ्याच्या मालकाला ही गोष्ट समजली. तेव्हा तो पोलिस ठाण्यात गेला आणि बकऱ्याला सोडवून आणले. दीपक वाल्मीकी नावाच्या मालकाचा तो बकरा होता.

या बकऱ्याने शनिवारी सायंकाळी एका व्हीआयपीच्या बंगल्यात शिरून गोंधळ घातला होता. व्हीआयपीने पोलिसांना ही माहिती दिली. प्रकरण व्हीआयपीच्या घरातील असल्याने पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून बकऱ्याला ताब्यात घेतले.



महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment