Railway News : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज राहील आणि यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. याशिवाय अजूनही देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत.
काही रेल्वे मार्गांची क्षमता सुद्धा वाढवली जात आहे. विदर्भात ही काही रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नागपूर ते नागभीड दरम्यानच्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतरित करण्याचा रेल्वे प्रकल्प.

दरम्यान याच बहुप्रतिक्षित नागपूर (इतवारी) ते नागभीड ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे या रेल्वे मार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा दिवाळीच्या आधीच सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला होणार आहे.
काय आहेत डिटेल्स
खरंतर इतवारी ते नागभीड दरम्यानच्या प्रकल्पाचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. आता जशी कामाची प्रगती आहे तशीच प्रगती आगामी काही दिवस कायम राहिली तर दिवाळीपूर्वी या मार्गाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.
संबंधित रेल्वे प्रकल्पाशी निगडित अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार नागपूरपासून उमरेडपर्यंतच्या 51 किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज लोहमार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
हेच कारण आहे की हा रेल्वे मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गावर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःही माहिती दिली आहे.
संपूर्ण प्रकल्प कसा आहे
नागपूर येथील इतवारी ते नागभीड या मार्ग ब्रॉडगेज मध्ये रूपांतरित केला जात आहे, हा एकूण 106 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची कामे महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल)मार्फत पूर्ण होत आहेत.
महारेल कडून ही कामे अगदीच युद्ध पातळीवर पूर्ण केली जात आहेत. या प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर प्रकल्पाचा 100% खर्च केंद्र आणि राज्य शासनामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा 50% खर्च केंद्र आणि 50 टक्के खर्च राज्य सरकार करणार आहे.
या मार्गावर उमरेड, भिवापूर, पवनी कॉम्पा, मोहाळी आणि नागभीड ही महत्त्वाची स्थानके राहणार आहेत. भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्याला नागभीड मार्गे नागपूरशी जोडणारा हा रेल्वे मार्ग विदर्भाच्या या जिल्ह्यांसाठी मोठा महत्त्वाचा राहणार आहे.
यामुळे संबंधित जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे जुने नॅरोगेज मार्ग संपुष्टात येऊन आधुनिक ब्रॉडगेज मार्गामुळे दळणवळण व्यवस्था फारच वेगवान होणार आहे.
प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि गतिमान प्रवासाची अनुभूती मिळणार आहे सोबतच कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रांना या मार्गाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे या संबंधित भागातील जवळपास 14 गावांमधील नागरिकांना नागपूर सोबत थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे.