Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर जुलै महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या तीन-चार दिवसात नव्या ऑगस्ट महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची यादी समोर आली आहे.
खरंतर ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या आधीच रक्षाबंधनाचा सणही येणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना खऱ्या अर्थाने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा आनंदाचा ठरणार आहे. कारण की त्यांना शुभेच्छा पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी राहणार आहे.

दरवर्षी श्रावण महिना सुरू झाला की सणासुदीचा काळ सुरू होतो आणि सणासुदीच्या हंगामात विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळतात. दरम्यान, आता आपण ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळा किती दिवसांसाठी बंद राहणार ? याची संपूर्ण यादी पाहुयात.
ऑगस्ट महिन्यात शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या मिळणार?
खरे तर, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आणि कोकणात मोठे धूम पाहायला मिळते. गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा होतो, मात्र मुंबईतील आणि कोकणातील गणेशोत्सवाची बातच खूप न्यारी असते.
सरकारकडून देखील मुंबईतील आणि कोकणातील गणेशोत्सवासाठी शालेय विद्यार्थ्यांना पाच दिवसांच्या सुट्ट्या दिल्या जातात. मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सवाचे सुरुवातीचे पाच दिवस शाळांना सुट्टी असते.
विशेष बाब अशी की यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणातील आणि मुंबईतील शाळांना दोन दिवस अतिरिक्त सुट्ट्या देण्यात आले आहेत. म्हणजे मुंबई सह कोकणातील शाळांना सलग सात दिवस गणेशोत्सवाच्या काळात सुट्ट्या मिळणार आहेत.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधील शाळांना मात्र गणरायाच्या आगमनाच्या दिवशी आणि गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सुट्टी मिळते. आता आपण ऑगस्ट महिन्याची संपूर्ण सुट्ट्यांची यादी पाहुयात.
9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने या दिवशी संपूर्ण राज्यभरात सुट्टी राहणार आहे.
10 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने राज्यातील शाळांना सुट्टी राहील.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आणि पारशी नववर्ष निमित्ताने राज्यातील सर्व शाळांना सुट्ट्या राहतील.
16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला / दहीहंडी निमित्ताने राज्यातील शाळांना सुट्टी राहणार आहे.
17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी राज्यातील शाळांना सुट्टी राहणार आहे.
24 ऑगस्ट 2025 रोजी रविवार असल्याने राज्यातील सर्वच शाळांना सुट्टी राहील.
27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी निमित्ताने राज्यातील सर्वच शाळांना सुट्टी राहील. दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील शाळांना 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2025 या काळात गणेशोत्सवाची सुट्टी राहणार आहे.