‘या’ आहेत 2025 मधील भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार ! यादीतली सर्वात स्वस्त कार फक्त 4.23 लाखांना, पहा संपूर्ण यादी….

नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप पाच गाड्यांची माहिती पाहणार आहोत. 

Published on -

India’s Cheapest Cars : श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात झाली की सणासुदीचा काळ सुरू होतो. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये सुरुवातीला रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होणार आहे आणि त्यानंतर गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाईल.

त्यानंतर मग विविध सण साजरे होतील. दरम्यान जर तुम्हाला ही यंदाच्या सणासुदीच्या हंगामात नवीन कार खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. कारण की आज आपण भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार्सची माहिती जाणून घेणार आहोत. 

भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार 

मारुती सुझुकी सेलेरियो : भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप पाच कार च्या यादीत या कारचा पाचवा क्रमांक लागतो. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत पाच लाखांपेक्षा थोडीशी अधिक आहे. मात्र ही गाडी मायलेज च्या बाबतीत फारच उत्कृष्ट आहे. ग्राहकांना ही गाडी सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 

टाटा टियागो : भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कारच्या यादीत या कारचा चौथा नंबर लागतो. टाटा भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी. या कंपनीने मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून टाटा टियागो या गाडीची निर्मिती केली आहे. या गाडीची विशेषता म्हणजे या गाडीला फोर स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 4.99 लाखं इतकी आहे.

या गाडीमध्ये ग्राहकांना 1.2-लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या गाडीची बिल्ड क्वालिटी खरच छान आहे. महत्वाचे बाब म्हणजे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी या गाडीत ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस आणि इतर सेफ्टी फीचर्स सुद्धा अपलोडेड आहेत आणि म्हणूनच ही गाडी या यादीतील सर्वाधिक हायटेक फीचरवाली गाडी सुद्धा आहे. 

रेनॉल्ट क्विड : भारतातील सर्वाधिक स्वस्त गाड्यांच्या यादीत या गाडीचा सुद्धा समावेश होतो. या यादीत ही गाडी तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 4.70 लाख एवढी आहे. या गाडीचे मायलेज देखील फारच उत्कृष्ट आहे. मध्यमवर्गीयांसाठी या गाडीचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो : या यादीत मारुती सुझुकीच्या या गाडीचा दुसरा नंबर लागतो. मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी असून मध्यमवर्गीयांना डोळ्यापुढे ठेवून या गाडीने आत्तापर्यंत अनेक कारची निर्मिती केली आहे. ही देखील मध्यमवर्गीयांना डोळ्यापुढे ठेवून डेव्हलप करण्यात आलेली एक हॉट सेलिंग कार आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 4.26 लाख इतकी आहे.

मारुती सुझुकी अल्टो K 10 : या यादीत पहिल्या नंबरवर देखील मारुती सुझुकीची गाडी आहे. मारुती सुझुकी अल्टो के 10 देशातील सर्वाधिक स्वस्त गाड्यांपैकी एक आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत फक्त 4.23 लाख रुपये इतकी आहे. ही गाडी चांगला पिकअप देते, शिवाय या गाडीचे मायलेज देखील उत्तम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!