अहिल्यानगर : टोमॅटोच्या भावात मात्र चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे सध्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतात उभा शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणणे शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालाचे नुकसान देखील होत आहे. मात्र खूप कालावधीनंतर शेतकऱ्यांना समानाधारक भाव मिळाला आहे .
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी विविध भाजीपाल्याची २३५३ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ७२४ क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. बटाट्याला १००० ते २३०० रुपये भाव मिळाला. टोमॅटोची ३२८ क्विंटलवर आवक झाली होती. टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची ४१ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना ५०० ते ३००० रुपये भाव मिळला.

अहिल्यानगर बाजार समितीत काकडीची १५२ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ३०० ते १५०० रुपये भाव मिळाला. गवारीची ९१ क्विंटल आवक झालो होती. गवारीला ४००० ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ९२ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला ४०० ते २००० रुपये भाव मिळाला.
घोसाळ्याची ९२ क्विंटल आवक झाली होती. घोसाळ्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची ३५ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला १००० ते ४५०० रुपये भाव मिळाला. कारल्याची ४९ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ३५ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल १००० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
कोबीची १९५५ विवंटल आवक झाली होती. कोबीला प्रतिक्विंटल ३०० ते १५०० रुपये भाव मिळाला. वालाची २९ क्विंटल आवक झाली होती. वालाला १००० ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. घेवड्याची २६ क्विंटलवर आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल १००० ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. गाजराची २१ क्विंटलवर आवक झाली होती. गाजराला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये भाव मिळाला.