सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक बिनविरोध ;दुधापासून इतर पदार्थ निर्मिती करून दूध संघाला बळकटी देणार : नागवडे

Published on -

अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून दुधापासून इतर पदार्थांची निर्मिती करून दूध संघाला बळकटी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संघाचे मार्गदर्शक संचालक व सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी जाहीर केले.

राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादक संघाच्या सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यात सर्वसाधारण मतदारसंघातून राजेंद्र शिवाजीराव नागवडे, कृष्णा दिपक नागवडे, किसनराव आबासाहेब नलगे, सुरेश गुलाबराव घोलप, सखाराम ज्ञानदेव निंबाळकर, संतोष माणिकराव पाचपुते, ज्ञानेश्वर रामदास पाचपुते, गीताराम भिवा थिटे, राजेंद्र दत्तात्रय दांगट, पार्वतीबाई सारंगधर भोईटे यांची तर महिला राखीव प्रतिनिधी म्हणून शोभा विजय भोईटे व गीता नरसिंग शिंदे, इतर मागासवर्ग प्रवर्गामधून दिलीप रोहिदास वागस्कर, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून अनिता अशोक साळवे, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून प्रभाकर भुजंगराव चोरमले यांची बिनविरोध निवड करण्यात आली .

या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार नागवडे कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस होते. यावेळी नागवडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांनी मोठ्या संघर्षातून हा दूध संघ स्थापन केला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले.

जिल्हा दूध संघाचे विभाजन झाल्यानंतर सर्व तालुका दुध संघांची निर्मिती झाली. नंतर बरेच तालुका दुध संघ बंद पडले परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून व खाजगी दूध संघाशी स्पर्धा करून आपला दूध संघ उभा आहे. या संघाच्या प्रगतीसाठी दुधापासून इतर पदार्थांची निर्मिती करून पाठबळ देण्याचा भविष्य काळात प्रयत्न करणार असल्याचे नागवडे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!