राहू ग्रहाच्या प्रभावाखाली जन्मलेल्या ‘या’ मुलांना लग्नासाठी करावा लागतो संघर्ष, स्वप्नातील जोडीदार भेटतो…पण खूपच उशिराने!

Published on -

अनेकांना वाटतं की प्रेमात सगळं सहज घडावं, पण काही जणांच्या वाट्याला सतत विलंब, गोंधळ आणि अपयश येतं. विशेषतः त्यांचा जन्म विशिष्ट संख्येखाली झाला असेल तर. अंकशास्त्रात अशी एक रहस्यमय संख्या आहे अंक 4, जी त्यांच्या वैयक्तिक जीवनात, विशेषतः लग्नाच्या बाबतीत, अनेक आव्हानं घेऊन येते. ज्यांचा जन्म 4,13,22 किंवा 31 तारखेला झाला आहे, त्यांच्या जीवनात नात्यांबाबत अनेक गुंतागुंती असतात.

मूलांक 4

या अंकाचे अधिपती ग्रह आहेत राहू. राहू हा भ्रम आणि मनाचा गोंधळ निर्माण करणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे अंक 4 असलेल्या लोकांचं व्यक्तिमत्त्वही थोडंसं गुंतागुंतीचं असतं. हे लोक फार शांत, गूढ आणि खोल विचार करणारे असतात. त्यांचं अंतरंग समुद्रासारखं खोल असतं. वरून शांत, पण आत अनेक विचारांची वादळं असतात.

या लोकांना जगाशी जुळवून घेण्यात वेळ लागतो, आणि हेच त्यांच्या नात्यांवरही परिणाम करतं. विवाहासाठी योग्य व्यक्ती शोधण्यात त्यांना खूप अडचणी येतात. कधी नातं अचानक तुटतं, कधी प्रेम समजणं कठीण जातं. राहूच्या प्रभावामुळे त्यांच्या निर्णयामध्ये अस्थिरता येते. त्यामुळे अनेक वेळा योग्य वेळा गमावली जाते आणि लग्न उशिरा होते.

पण या विलंबामागे केवळ अडथळेच नसतात. कारण जेव्हा हे लोक एका नात्यात पूर्णपणे गुंततात, तेव्हा ते नातं अत्यंत प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारं असतं. त्यांच्या नात्यात खोल समजूत असते, आणि ते भावनिक पातळीवर खूपच समर्पित असतात. एकदा का त्यांचं मन स्थिर झालं, की ते आयुष्यभरासाठी नातं जपत राहतात.

वैवाहिक आयुष्य कसे असते?

त्यांच्या जीवनात मोठे बदल, संघर्ष आणि वैचारिक झुंज घडत असते. हे अनुभव त्यांना अधिक प्रगल्भ, स्थिर आणि गंभीर बनवतात. एकदा त्यांनी स्वतःला समजून घेतलं, की ते इतरांनाही सहजपणे समजून घेऊ शकतात. आणि हीच गोष्ट त्यांच्या नात्यांमध्ये नवीन उर्जा आणि शाश्वतता निर्माण करते.

अंक 4असलेल्या लोकांचं प्रेम जीवन हे सहज नसतं.पण एकदा ते फुललं, की ते खऱ्या अर्थाने अमर होऊन जातं. अशा व्यक्तींशी नातं जोडणं म्हणजे एका खोल समजुतीच्या प्रवासाला सुरुवात करणं असतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!