महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवले जाणार ! फडणवीस सरकार मधील मंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे.

Published on -

Government Employee Retirement Age : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आणि देशभरातील इतर 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 60 वर्ष करण्यात यावे अशी मागणी उपस्थित करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला जातोय.

गेल्या शिंदे सरकारच्या काळात यासाठी सर्वाधिक पाठपुरावा झाला. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन सुद्धा दिले होते. मात्र एकनाथ शिंदे यांचे हे आश्वासन हवेतच विरले आहे.

कारण की राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत राज्य शासन दरबारी अजून कोणताच अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र अशातच राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष होणार 

महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशन या संस्थेचे अधिवेशन नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले. या अधिवेशनाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी पाटील यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करण्याची मोठी घोषणा केली.

सध्या राज्यातील प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष इतके आहेत. मात्र हे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत करण्याची म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय तीन वर्षांनी वाढवण्याची मोठी घोषणा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना अधिक काळ सेवा देता येणार आहे.

या निर्णयामुळे प्राचार्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यासोबतच शिक्षण विभागाला देखील या निर्णयाचा फायदा होईल अशी आशा आहे. राज्यभरातील कार्यरत प्राचार्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा शिक्षण क्षेत्राला मिळेल आणि यामुळे विद्यार्थ्यांचाही फायदा होईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय काय ? 

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ, ब आणि क या संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके आहे. दुसरीकडे राज्यातील ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे आहे यामुळे राज्यातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष झाले पाहिजे अशी मागणी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!