नवीन QR कोडमुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित!पण जुनं कार्ड अजून वापरता येईल का?, जाणून घ्या

Published on -

आजच्या डिजिटल युगात आपली ओळख सुरक्षित ठेवणं ही जितकी गरज आहे, तितकीच ती जबाबदारीसुद्धा आहे. मोबाईल नंबरपासून ते बँक खात्यांपर्यंत आणि सरकारी योजनांपासून ते विद्यार्थीदशेतील प्रवेशांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड आपली ओळख सिद्ध करायला लागते. त्यामुळे आधारचा गैरवापर किंवा बनावट कार्डाची शक्यता अधिक वाढली आहे. हे लक्षात घेऊन UIDAI ने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.आता आधार कार्डमध्ये एक नविन QR कोड जोडण्यात आला आहे, जो तुमची ओळख अधिक सुरक्षित, जलद आणि सोपी करतो.

पूर्वीच्या आधार कार्डांमध्ये केवळ आधार क्रमांक आणि छायाचित्र होतं. पण आता, नवीन QR कोडसह मिळणाऱ्या आधार कार्डांमध्ये तुमचा फोटो, नाव, जन्मतारीख आणि आणखी काही तपशील QR कोडमध्येच एन्क्रिप्ट करून ठेवले जातात. विशेष म्हणजे, हा QR कोड एकदम छेडछाड मुक्त असतो. म्हणजे त्यात कोणताही बदल करता येत नाही. त्यामुळे जर कोणी बनावट ओळख तयार करायचा प्रयत्न केला, तरी UIDAI च्या अधिकृत स्कॅनरवर लगेच सत्य समोर येईल. हा QR कोड तुम्हाला ई-आधार, PVC आधार किंवा UIDAI च्या वेबसाइटवरून डाउनलोड केलेल्या नवीन फॉरमॅटमध्ये मिळू शकतो.

नवीन ई-आधारचे फायदे

या नव्या QR कोडमुळे आधार क्रमांक लक्षात ठेवायची गरजही उरलेली नाही. स्कॅन करताच लगेच संबंधित माहिती स्क्रीनवर झळकते, आणि ती थेट UIDAI कडून प्रमाणित झालेली असल्याने कोणतीही शंका राहात नाही. इतकंच काय, इंटरनेट नसतानासुद्धा हा QR कोड ऑफलाइन स्कॅन करून पडताळता येतो, त्यामुळे ग्रामीण भागातही तो अतिशय उपयुक्त ठरतो. ज्यांना वारंवार आपली ओळख पुरवावी लागते जसं की बँक कर्मचारी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवताना किंवा सरकारी सेवा वापरताना, त्यांच्यासाठी हे खरोखर एक मोठं सोयीचं साधन आहे.

नवीन ई-आधार कुठे मिळेल?

पण त्यामुळे जुनं आधार कार्ड कालबाह्य झालंय का, असा प्रश्न अनेकांना पडतो. UIDAI ने स्पष्टपणे सांगितलं आहे की जुनं आधार कार्डही पूर्णपणे वैध आहे आणि ते वापरता येईल. त्यामुळे जर तुमच्याकडे सध्याचं कार्ड असेल, तर घाबरण्याचं काही कारण नाही. मात्र, जर तुम्हाला QR कोडसह अधिक सुरक्षित आधार कार्ड पाहिजे असेल, तर UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून नवीन ई-आधार सहज डाउनलोड करता येतो. याशिवाय, तुम्ही PVC कार्डसुद्धा ऑर्डर करू शकता, जे अधिक टिकाऊ आणि स्मार्ट दिसणारं असतं.

QR कोड स्कॅन करून तपशील पडताळण्यासाठी UIDAI चं ‘आधार QR स्कॅनर’ अ‍ॅपही उपलब्ध आहे. mAadhaar अ‍ॅप वापरूनही तुम्ही QR कोडसह आधार सहज मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!