हनुमानजींच्या भक्तीची आणि शक्तीची हजारो वर्षांपासून पूजा होत असली, तरी अनेकांना त्यांना दिलेल्या अमरत्वाच्या वरदानाची खरी माहिती नसते. खरे तर, 90% लोक असा समज करतात की हे वरदान हनुमानजींना श्रीरामांनी दिले. मात्र, वाल्मिकी रामायणानुसार ही माहिती थोडी वेगळी आहे.


रामायणातील एका सुंदर आणि भावनिक क्षणात, ही कथा उलगडते. जेव्हा हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी अशोक वाटिकेत सीतेला रामाची अंगठी दिली. सीतेने ती अंगठी ओळखली आणि हनुमानजींच्या समर्पणाने भारावून गेली. हाच तो क्षण होता, जेव्हा माता सीतेने हनुमानजींना अमर होण्याचे वरदान दिले.
माता सितेने दिले होते अमरत्वचे वरदान

या वरदानानंतर हनुमानजी केवळ एक सामान्य भक्त राहिले नाहीत, तर त्यांनी पुढे युद्धात रामांसाठी निर्णायक भूमिका बजावली. रावणाचा पराभव आणि सीतेचे पुनरागमन हे सर्व घडवताना हनुमानजींची भूमिका अनमोल होती.

पुढे, जेव्हा श्रीराम अयोध्येत परतले, तेव्हा हनुमानजीही त्यांच्यासोबत आले. रामाच्या चरणी सेवा करणं हेच त्यांचं जीवनधर्म ठरलं. रोज श्रीरामाची पूजा करणाऱ्या हनुमानजींच्या मनात मात्र एक शंका राहून गेली, जेव्हा श्रीराम या पृथ्वीवरून आपला देह ठेवतील, तेव्हा मी काय करावे?
भगवान श्रीराम यांचा आदेश

हीच शंका त्यांनी एक दिवस आई सीतेपुढे मांडली. त्यावर हनुमानजींनी श्रीरामांसोबत वैकुंठात जाण्याचा हट्ट धरला. पण श्रीरामांनी त्यांना मिठीत घेत सांगितलं, “मी जाईन, पण पृथ्वीवर जो कोणी रामनाम घेईल, त्याचा उद्धार तू करशील.” हे ऐकून हनुमानजींनी अमरत्वाचे वरदान स्वीकारले.

आजही असं मानलं जातं की, हनुमानजी कलियुगातही भौतिक स्वरूपात या पृथ्वीवर उपस्थित आहेत, जेथे भक्त रामनामात लीन असतो, तेथे हनुमान आपले अमर अस्तित्व सिद्ध करतात.













