India’s Richest Districts : भारत हा एक वेगाने प्रगती करणारा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही सध्या भारत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश बनलाय. शिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले आहे. सध्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आधी आपली इकॉनोमी पाचव्या क्रमांकाची होती.
भारताच्या अर्थव्यवस्थेत सर्वच क्षेत्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. पण भारतीय अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल तरी देखील देशात संपत्तीचे मोठ्या प्रमाणात असमान वितरण झालेले आहे. देशात काही लोक प्रचंड श्रीमंत तर काही लोक प्रचंड गरीब आहेत. तसेच देशातील काही राज्य खूपच श्रीमंत तर काही राज्य खूपच गरीब आहेत. दरम्यान आज आपण भारतातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 9 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहोत.

हे आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हे
मुंबई : मीडिया रिपोर्टनुसार, देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुंबईमध्ये तुम्हाला अनेक मोठ्या कंपन्यांची आणि बँकांची मुख्यालय पाहायला मिळतील. एसबीआय, आयसीआयसीआय यांसारख्या बँकांची इथे मुख्यालय आहेत.
एवढेच काय भारतीय शेअर मार्केटचे मुख्यालय सुद्धा इथेच आहे. आरबीआयचे मुख्यालय सुद्धा मुंबईत आहे. बॉलीवूड मुळे मुंबईला चांगलाच ग्लॅमर मिळाला आहे. याशिवाय तुम्हाला इतरही अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्यालय इथं पाहायला मिळतील आणि म्हणूनच मुंबई देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे.
दिल्ली : देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्ली सुद्धा देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत येते. राजधानी दिल्ली आधीपासूनच राजकारणाचे केंद्र राहिले आहे. भारताची ओळख त्याच्या राजधानी वरून म्हणजेच दिल्लीवरूनच होते.
दिल्ली राजकारणाचे तर केंद्र आहेच सोबतच सेवा आणि व्यवसायाचे देखील केंद्र बनत चालले आहे. येथे तुम्हाला अनेक सरकारी कार्यालय, विविध देशांचे दूतावास, कॉर्पोरेट कंपन्या पाहायला मिळतील. दिल्लीचा एकूण जीडीपी हा दहा लाख कोटींपेक्षा अधिक आहे.
बंगळुरू : या यादीत बंगळुरू जिल्ह्याचा सुद्धा समावेश होतो. खरंतर बंगळुरूला आयटी हब म्हणून ओळखले जाते. येथे तुम्हाला इन्फोसिस, विप्रो, टीसीएस अशा असंख्य आयटी कंपन्या पाहायला मिळतील. हैदराबादमध्येही आयटी, फार्मा आणि बायोटेक उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे.
एचआयटीईसी सिटी आणि गचीबोवली येथे तुम्हाला अनेक मल्टिनॅशनल कंपन्या दिसतील. या ठिकाणी अनेक ग्लोबल कंपन्या आहेत अन म्हणूनच देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत हा पण जिल्हा येतो.
चेन्नई : भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत चेन्नईचा सुद्धा समावेश केला जातो. येथे ऑटोमोबाईल, आयटी आणि आरोग्य या तीन सेक्टरच्या कंपन्या तुम्हाला पाहायला मिळतील. येथील उद्योगामुळे जिल्ह्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित झाला आहे.
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेश राज्यातील हा जिल्हा देखील भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत ठेवला जातो. कारण म्हणजे या जिल्ह्याला आंध्र प्रदेशचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्याचा औद्योगिक विकास हा खरंच वाखाण्याजोगा आहे. बंदर, पोलाद, खद आणि पेट्रोल केमिकल उद्योगांमुळे या जिल्ह्याचा जीडीपी अलीकडील काही वर्षांमध्ये चांगलाच वाढला आहे.
कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील हा जिल्हा देखील भारतातील सर्वाधिक श्रीमंत जिल्ह्यांचे अधिक ठेवला जातो. खरंतर या शहराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून विशेष महत्त्व दिले जाते. कोलकत्ता हे पूर्व भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे आणि या जिल्ह्याचा जीडीपी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलाय.
सुरत : गुजरात राज्यातील सुरत हा जिल्हा कापड उद्योगांसाठी आणि हिऱ्यांच्या व्यापारासाठी जगात प्रसिद्ध आहे. हिरे आणि कापड यामुळे या जिल्ह्याने आपले एक वेगळे वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि या जिल्ह्याचा जीडीपी देखील गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलाय. म्हणूनच देशातील सर्वाधिक श्रीमंत जिल्ह्यात या जिल्ह्यालाही स्थान देण्यात आल आहे.
पुणे : महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत पुण्याचा नेहमीच समावेश होतो आणि हा जिल्हा भारतातील श्रीमंत जिल्ह्यांमध्ये सुद्धा समाविष्ट आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब म्हणून या जिल्ह्याला ओळखले जाते. पुण्यात तुम्हाला मोठमोठ्या आयटी कंपन्या पाहायला मिळतील. या ठिकाणी तुम्हाला असंख्य शैक्षणिक संस्था दिसतील. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सुद्धा पुण्यातच आहे.
येथे तुम्हाला अनेक ऑटो कंपन्या सुद्धा पाहायला मिळतील. या जिल्ह्यातील कृषी क्षेत्र देखील नेहमीच आघाडीवर राहिले आहे. ऊस, सोयाबीन, डाळिंब, अशा विविध पिकांमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेले आहे. परिणामी या जिल्ह्याचा जीडीपी देखील गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलाय.
अहमदाबाद : या यादीत गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्हा सुद्धा समाविष्ट आहे. कापड, रसायन आणि रिअल इस्टेट यामध्ये अहमदाबादचा मोठा दबदबा आहे. गुजरातच्या एकूण जीडीपी मध्ये या जिल्ह्याचे मोठे योगदान राहते. या जिल्ह्याचा जीडीपी देखील अलीकडील काही वर्षात वाढलाय.