Maharashtra Schools : ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे.
श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. या महिन्यात अनेक लोक मांसाहार करत नाहीत. श्रावण महिन्यात रक्षाबंधन, गणेशोत्सव असे अनेक सण साजरा होतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत.

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी
मीडिया रिपोर्टनुसार ऑगस्ट महिन्यात राज्यातील मुंबई सह कोंकण विभागातील शाळांना सलग सात दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरे तर दरवर्षी मुंबई आणि कोकणातील शाळांना गणेशोत्सवाच्या काळात सुरुवातीचे पाच दिवस सुट्ट्या दिल्या जातात.
मात्र यंदा या सुट्ट्यांमध्ये दोन दिवसांची भर पडली आहे. यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 साठी मुंबई आणि कोकणातील शालेय विद्यार्थ्यांना गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर म्हणजेच 27 ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर पर्यंत सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
तसेच महाराष्ट्रातील सर्वच शाळांना 15 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंतच्या तीन दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या राहणार आहेत. अशा स्थितीत आता आपण राज्यातील शाळांना कोणकोणत्या तारखांना सुट्ट्या राहणार आणि सुट्टीचे कारण काय त्याची माहिती पाहूया.
9 ऑगस्ट 2025 : रक्षाबंधन निमित्ताने या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच शाळांना सुट्टी राहणार आहे.
10 ऑगस्ट 2025 : रविवार असल्याने या दिवशी सर्वच शाळांना सुट्टी असेल.
15 ऑगस्ट 2025 : या दिवशी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने आणि पारशी नववर्ष निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वच शाळांना सुट्टी राहणार आहे.
16 ऑगस्ट 2025 : या दिवशी गोपाळकाला आणि दहीहंडीचा सण साजरा होईल आणि म्हणूनच राज्यातील सर्व शाळा या दिवशी बंद राहतील.
17 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट 2025 : या दोन्ही दिवशी रविवार निमित्ताने विद्यार्थ्यांना साप्ताहिक सुट्टी राहील.
27 ऑगस्ट 2025 : या दिवशी गणेश चतुर्थी निमित्ताने राज्यातील सर्वच शाळांना सुट्टी राहणार आहे. दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील शाळांना 27 ऑगस्ट पासून सलग सात दिवस म्हणजेच 2 सप्टेंबर 2025 पर्यंत सुट्ट्या राहतील.