शेवटी संकटाचा काळ संपलाच ! पुढील 17 महिने ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, पुढील 17 महिने म्हणजे डिसेंबर 2026 पर्यंतचा काळ राशीचक्रातील 3 राशीच्या लोकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. केतू ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. 

Published on -

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात सूर्य शुक्र चंद्र या ग्रहांप्रमाणेच राहू केतू या ग्रहांना देखील विशेष महत्त्व आहे. इतर ग्रहांप्रमाणेच राहू आणि केतू ग्रह देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान जेव्हा केव्हा राहू आणि केतू ग्रहाचे राशी तसेच नक्षत्र परिवर्तन होते तेव्हा याचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळतो.

दरम्यान केतू ग्रहाच्या कृपेमुळे पुढील 17 महिने काही राशीच्या लोकांना जबरदस्त यश मिळणार आहे. ज्योतिष तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे जर कुंडलीत केतूग्रह शुभ असेल तर व्यक्तीच्या आयुष्यात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होण्याची शक्यता आहे.

केतू ग्रह शुभ असल्यास अनेक गोष्टी साध्य करता येतात. पण जर कुंडली मध्ये केतू ग्रह अशुभ असेल तर अशावेळी वाईट गोष्टी सुद्धा घडण्याची शक्यता असते. दरम्यान केतू ग्रहाने मे महिन्यामध्ये सिंह राशीमध्ये प्रवेश घेतला आहे.

केतू ग्रह प्रत्येक राशीत दीड वर्षांसाठी राहतो यानुसार केतू ग्रह सिंह राशीत डिसेंबर 2026 पर्यंत विराजमान राहील आणि त्यानंतर मग केतू ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. म्हणजेच पुढील 16-17 महीने केतू ग्रह एकाच राशीत राहणार आहे आणि याचा राशीचक्रातील काही लोकांना फायदा होणार आहे. 

ह्या राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत यश 

मकर : या राशीच्या लोकांचा संकटाचा काळ कधीच संपला आहे आणि आता पुढील 16-17 महिने या राशीच्या लोकांसाठी विशेष खास ठरणार आहे. कारण की केतू ग्रह या राशीच्या लोकांवर विशेष प्रसन्न आहे. यामुळे पुढील काही महिने या राशीच्या लोकांमध्ये कमालीचे साहस पाहायला मिळणार आहे आणि यांचा आत्मविश्वास देखील कमालीचा वाढलेला राहणार आहे.

या लोकांची प्रलंबित कामे सुद्धा या काळात पूर्ण होऊ शकतात. आर्थिक दृष्ट्या हा काळ विशेष अनुकूल राहणार आहे. या लोकांना व्यवसायात सुद्धा चांगली यश मिळणार आहे. करिअरवाईज हा काळ चांगला राहील. कुटुंबात सुद्धा अगदीच आनंदाचे वातावरण राहणार आहे.  

वृषभ : मकर राशीच्या लोकांप्रमाणेच ह्या राशीच्या जातकांना सुद्धा पुढील काही महिने चांगले लाभ मिळणार आहेत. या लोकांचाही संकटाचा काळ इतिहासात जमा झाला आहे. या काळात या लोकांच्या अनेक छोट्या-मोठ्या इच्छा पूर्ण होतील.

या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या लोकांना गुंतवणुकीतून देखील चांगला फायदा मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनची तसेच पगारवाढीची भेट मिळू शकते. 

मेष : पुढील 16 – 17 महिने या राशीच्या लोकांसाठी फारच लाभदायक राहतील असे बोलले जात आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ विशेष अनुकूल राहणार आहे.

या लोकांना आपापल्या कामांमध्ये चांगली यश मिळणार आहे. दूरवरच्या प्रवासाचे योग तयार होत आहेत. कुटुंबातही अगदीच आनंदाचे वातावरण राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फारच अनुकूल राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!