लग्न मोडल्याने तरुणाने इमारतीवरून मारली उडी !

Ahmednagarlive24
Published:

पालनपूर :- शहरात एका तरुणाचे लग्न मोडले. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. नैराश्यग्रस्त अवस्थेतच त्याने पोलिसांच्या समोरच इमारतीवरून खाली उडी मारली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वासणा गावातील राहुल वाल्मिकी (२१) याचे लग्न ठरले होते. परंतु नियोजित वधूने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

त्यामुळे तो निराश झाला होता. सोमवारी तो शहरातील डॉक्टर्स हाऊस भागातील एका इमारतीवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेला.

तेथील तरुणांना त्याचा संशय आला. त्यांनी राहुलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यांनी पोलिसांना कळवले.

पोलिस व अग्निशमन दलाचे कर्मचारी तेथे आले. त्यांच्या समक्षच इमारतीवरून उडी घेतली. परंतु तो खाली जाळ्यात फसला आणि वाचला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment