अहिल्यानगर महानगरपालिकेने केलेली गाळे भाडेवाढ रद्द करावी, भाजपा व्यापारी आघाडीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी

Published on -

अहिल्यानगर- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबारात भाजपा व्यापारी आघाडी च्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष महेश गुगळे यांनी मनपाच्या जुने दाणे डबरा व गंजबाजार, गाळे भाडे वाढीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. धनंजय जाधव, नीरज राठोड, हर्षल बोरा, हेमंत पवार, आनंद लहामगे, सुरेश लालबागे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिका जुने दाणे डबरा व गंजबाजार, गाळे भाडे वाढी अन्याकारक असून गाळेधारकांकडून घटनाबाह्य अवाजवी भाडे आकारणी झालेली असून सदर आकारणी रद्द करण्यात यावी. गाळेधारकांचे मालक महानगरपालिका असताना गाळेधारकांकडून घरपट्टी व इतर कर घेऊ नये.

तत्कालीन नगर पालिकेने गाळेधारकांना खुली जागा दिली असता प्रत्येक गाळा धारकाने गाळे स्वखर्चाने बांधून घेतले आहेत. त्यांना फक्त खुली जागा भाडे आकारणी करण्यात यावी. याबाबत मनपास वेळोवेळी निवेदनाद्वारे सुचित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe