कोरडगाव परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट, कोरडगाव येथे पोलीस चौकीस मंजूरी देण्याची मागणी

Published on -

पाथर्डी- कोरडगाव येथे पोलीस चौकीस मंजुरी द्यावी, अशी मागणी कोरडगावचे सरपंच रवींद्र उर्फ भोरूशेठ म्हस्के व परिसरातील जिरेवाडी, दैत्यनांदूर, तोंडोळी, औरंगपूर, कोळसांगवी, निपाणी जळगाव, येथील सरपंचांनी पोलीस उपनिरीक्ष महादेव गुट्टे यांची भेट घेऊन केली आहे.

कोरडगाव हे बाजारपेठेचे गाव असून, शेजारी असणारे जिरेवाडीला येताना कोळसांगवी, निपाणी जळगाव, औरंगपूर, तोंडोळी, कळसपिंपरी, या गावांतील दैनंदिन व्यवहारासाठी अनेक लोक कोरडगाव येथे येतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरडगाव आणि परिसरात अवैध व्यवसाय व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसण्यासाठी कोरडगाव येथे पोलीस चौकी मंजूर व्हावी, तेथे अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित असल्यास परिसरातील गुन्हेगारांवर वचक बसून शांतता राहील. यासाठी कोरडगावचे सरपंच भोरूशेठ म्हस्के जिरेवाडीचे सरपंच मुकुंद अंधळे, रमेश देवा जोशी, औरंगपूरचे सरपंच दादासाहेब किलबिले, कोळसांगवीचे सरपंच युवराज फुंदे, तोंडोळीचे सरपंच पिंटू भाऊ वारंगुळे, दैत्यनांदूरचे सरपंच संजय भाऊ देशमुख, भैय्या पठाण, रणजीत बांगर यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात येऊन उपनिरीक्षक महादेव गुट्टे यांना लेखी निवेदन दिले आहे.

कोरडगाव परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. पोलिसांचा वचक या भागात राहावा, यासाठी कोरडगावात पोलीस चौकी होणे महत्त्वाचे आहे. भुरट्या चोऱ्या व इतर गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे कोरडगाव येथे पोलीस चौकी येथे मंजूर करावी.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!