संगमनेर- लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मागील ४० वर्ष अथक प्रयत्नातून संगमनेर तालुका वैभवशाली बनविला. तालुक्याचा लौकिक राज्यात वाढवला. मात्र, काही लोक आता तालुक्याची संस्कृती मोडू पाहत आहे. त्यामुळे फ्लेक्स फाडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी येथील शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काल मंगळवारी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी अजय फटांगरे, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, सुरेशराव झावरे, अर्चनाताई बालोडे, प्रमिलाताई अभंग, अंकुश ताजणे, गणेश मादास, मुजिन खान, बाळासाहेब पवार, भरत कळसकर, शेख युनूस, शहाबाजअली शेख, ज्ञानेश्वर राक्षे, गणेश बलसाने, राजेंद्र वाकचौरे, अॅड. प्रमोद कडलक, किशोर टोकसे, जीवन पंचारिया, प्रशांत अभंग, सौरभ कडलग, वैष्णव मुर्तडक, अमित गुंजाळ, विजय उदावंत, सुभाष दिघे, अन्सार सय्यद, प्रमोद गणोरे, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, गजेंद्र नाकील, जावेद पठाण आदी उपस्थित होते.
सदर निवेदनात म्हटले आहे की, मागील सप्ताहामध्ये संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा फोटो असलेला, भक्तांचे स्वागत करणारा फ्लेक्स लावला होता. काही व्यक्तींनी सदर फ्लेक्स फाडला. याबद्दल तातडीने कारवाई झाली पाहिजे. तसेच शहरामध्ये माळुंगी नदी नजीक मंदिराजवळ नागपंचमीनिमित्त लावलेल्या फ्लेक्स फाडण्यात आला.
त्यामुळे जे दोषी असतील, त्यांना तातडीने अटक करून कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्वासराव मुर्तडक यांनी दिला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी निवेदन स्वीकारून चौकशी करण्याचे आश्वासन दिले.