आठव्या वेतन आयोगात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ?

तुम्हीही नव्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहात का? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. कारण की, नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी विभागांमध्ये शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार, याबाबत आता आपण माहिती पाहूयात.

Published on -

8th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आता फक्त आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे. केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे.

लवकरच या समितीच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती केली जाईल आणि त्यानंतर मग या समितीकडून आठव्या वेतन आयोगाचे कामकाज सुरू होणार आहे. यानंतर मग समितीकडून सरकारकडे शिफारशी सादर केल्या जाणार आहेत.

अजून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारकडे पोहोचलेल्या नाहीत मात्र मीडिया रिपोर्ट मध्ये नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 इतका राहू शकतो असा दावा केला जातोय. तज्ञ सांगतात की प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो.

सध्याचा सातवा वेतन आयोग 2016 पासून प्रभावी आहे. यानुसार 2026 पासून नवा वेतन आयोग लागू होणार असून नवीन वेतन आयोग केवळ मूलभूत पगाराचा आढावा घेणार नाही तर कर्मचार्‍यांना महागाई भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा, घरभाडे भत्ता यासारख्या इतर अनेक फायद्यांचे मूल्यांकन देखील करणार आहे.

हेच कारण आहे की देशभरातील सर्व सरकारी कर्मचारी उत्सुकतेने या आयोगाची वाट पाहत आहेत. दरम्यान आता आपण नवा आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी विभागातील शिपायाचा पगार किती वाढू शकतो याबाबतची माहिती पाहूयात.

आठव्या वेतन आयोगानुसार शिपायाला किती पगार मिळणार?

तज्ञांकडून प्राप्त माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पीडब्ल्यूडीसारख्या विभागातील शिपाई मल्टी-टास्किंग स्टाफ आणि अटेंडंट यासारख्या पदावर काम करणाऱ्या स्तर -1 च्या कर्मचाऱ्यांच्या पगारात तिप्पट वाढ होणार आहे. शिपाई सारख्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातवा वेतन आयोग अंतर्गत 18 हजार रुपये इतका बेसिक पगार मिळतोय.

मात्र नवीन आठवा वेतन आयोग प्रभावी झाल्यानंतर 2.86 फिटमेंट फॅक्टरनुसार अशा कर्मचार्‍यांचा पगार सुमारे 51,480 पर्यंत वाढू शकतो. मात्र प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारकडे सादर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होणार ?

सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी 2026 पासून सुरू झाली. म्हणजेच 31 डिसेंबर 2025 रोजी सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षांचा काळ पूर्ण होणार आहे. हेच कारण आहे की एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू केला जाईल असे बोलले जात आहे.

तथापि या संदर्भात केंद्रातील सरकारकडून अजून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. म्हणून नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!