जन्मतारखेमुळे आपली ओळख, व्यक्तिमत्त्व आणि भविष्य घडतं असं मानणारं अंकशास्त्र ही एक प्राचीन आणि गूढ विद्या आहे. आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं या अंकांमध्ये दडलेली असतात. विशेषतः मूलांक 2 आणि 6 या दोन संख्यांना सौंदर्य आणि बुध्दीचा परिपूर्ण संगम मानलं जातं. जे लोक या मूलांकांमध्ये जन्म घेतात, त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं आकर्षक असतं की ते गर्दीतही वेगळं जाणवतं.
मूलांक 2

मूलांक 2 हा चंद्राशी संबंधित असतो. 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक हा मूलांक घेऊन येतात. त्यांच्या स्वभावात चंद्रासारखी कोमलता आणि सौंदर्य असतं. हे लोक फक्त बाह्यरूपाने सुंदर नसतात, तर मनानेही निर्मळ, सच्चे आणि प्रेमळ असतात. त्यांची शांत वृत्ती, सर्जनशील विचार आणि कल्पकतेमुळे ते कोणत्याही समस्येवर सहज उपाय शोधतात. प्रेमाच्या बाबतीतही हे लोक अतिशय समर्पित असतात. ते त्यांच्या जोडीदारावर मनापासून प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात. मात्र, कधीकधी निर्णय घेण्याच्या बाबतीत थोडे गोंधळतात.
मूलांक 6
दुसरीकडे, मूलांक 6 हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्यांचे व्यक्तिमत्त्व मोहक आणि करिश्मादायक असते. ते फॅशन, स्टाईल आणि सौंदर्य याबाबतीत सतत अपडेट राहतात. त्यांची उपस्थिती सर्वांनाच भुरळ घालते. सामाजिकदृष्ट्या हे लोक फारच लोकप्रिय असतात.
त्यांची दयाळू वृत्ती, प्रेमळ स्वभाव आणि आदर्श जोडीदार बनण्याची क्षमता त्यांना खास बनवते. ते केवळ स्वतःच्या सौंदर्याबद्दलच जागरूक नसतात, तर इतरांचंही भलं व्हावं यासाठी नेहमी तत्पर असतात.
हे दोन्ही मूलांक असणारे व्यक्ती फक्त सौंदर्य नाही तर बुध्दी, समज, आणि माणुसकीमध्येही आघाडीवर असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात यश, पैसा, प्रसिद्धी आणि प्रेम आपोआप येतं. अनेकदा हे लोक करिअर, नातेसंबंध आणि समाजात एक वेगळी ओळख निर्माण करतात. त्यांच्या अंतर्मुख सौंदर्यामुळेच ते इतरांपेक्षा वेगळे भासतात.