अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- कोरोना काळामध्ये शेतकरी, दूध उत्पादक आणि हातावर पोट असणारे व्यावसायिक यांना अनेक समस्यांना सामोरे लागले. परंतु आता लॉक डाऊन शिथिल झाल्याने पुन्हा व्यवसाय तेजीकडे जाऊ लागले आहेत.
परंतु या भयानक काळामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असतानाही दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी, वाहतूकदार, संघाला मालाचा पुरवठा करणारे विक्रेते यांनी संघाशी एकनिष्ठ राहून संघाप्रती विश्वास दाखविला.

त्यामुळे त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने दीपावली सणानिमित्त दूध उत्पादकांचे पेमेंट, परतीच्या ठेवी,
वाहतूकदारांचे पेमेंट आणि कर्मचार्यांसाठीचा बोनस व पगार असे सुमारे 16 कोटी 63 लाख रुपये 5 नोव्हेंबरपर्यंत बँकेत वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली.
गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना दि. 11 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या एका महिन्याच्या कालावधीचे पेमेंट 10 कोटी 83 लाख रुपये, परतीच्या ठेवीची रक्कम साधारणपणे 4 कोटी रुपये,
संघाच्या कर्मचार्यांना पगार व बोनसपोटी 1 कोटी रुपये, अंतर्गत व बहिर्गत दूध वाहतूक करणार्या वाहतूकदारांचे तसेच संघाला मालपुरवठा करणार्या पुरवठाधारकांचे पेमेंट साधारणपणे 1 कोटी अशी एकूण 16 कोटी 63 लाख रुपये रक्कम 5 नोव्हेंबरपर्यंत बँकेत वर्ग केली जाणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved