ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार ! वित्त विभागाकडून 1400 कोटी रुपये मंजूर ?

Published on -

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून मोठे पगार वाढ लागू केली जाणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून लवकरच 1400 कोटी रुपये मंजूर केले जातील अशी माहिती समोर आली आहे. खरेतर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन केले होते.

टप्पा अनुदानावरील शाळांना वाढीव अनुदान मिळावे या आपल्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन उभारण्यात आले. या आंदोलनाला विविध शैक्षणिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला.

यामुळे संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आणि शिक्षकांपुढे शासनाला झुकावे लागले. अखेर राज्य सरकारने विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के वाढीव अनुदान मंजूर करण्याची घोषणा केली.

दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादाजी दगडू भुसे यांनी माहे ऑगस्ट महिन्याच्या वेतनापासून याचा प्रत्यक्षात शिक्षकांना लाभ होणार अशी ग्वाही दिली. यामुळे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये सध्या मोठे समाधानाचे वातावरण आहे.

 राज्यातील किती शिक्षकांना होणार फायदा?

 सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला राज्यात 49 हजार 562 शिक्षक अनुदानावर कार्यरत आहेत. दरम्यान 20% वाढीव अनुदान मंजूर करण्याचा घेण्यात आलेला हा निर्णय या संबंधित अनुदानावरील शिक्षकांसाठी दिलासादायी ठरणार आहे.

कारण की या हजारो शिक्षकांना आता ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जे वेतन सप्टेंबर मध्ये शिक्षकांच्या खात्यात येईल त्या वेतनासोबत या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून संबंधित अनुदानावरील शिक्षकांचा पगार 20 टक्क्यांनी वाढणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत 20 टक्के टप्पा वाढ लागू करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली असून यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणी केली आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे तब्बल 1400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे लवकरच वित्त विभागाकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान वित्त विभागाकडून वाढीव अनुदानासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित अनुदानावरील शिक्षकांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. 

या शाळांना 100% अनुदान 

महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार आता 1999 पासून ज्या शाळा 60 ते 80 टक्के अनुदानावर कार्यरत आहे त्या शाळा आता 100% अनुदानावर कार्यरत होतील. सदरची वाढ ही ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच सप्टेंबर महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारांसोबत लागू केली जाईल.

तथापि टप्पावाढी बाबतची पुढील कार्यवाही राज्य शासनाकडून शासन निर्णय जारी झाल्यानंतरच होणार आहे. यामुळे आता वित्त विभागाकडून यासाठी निधीची उपलब्धता कधी करून दिली जाते अन केव्हा प्रत्यक्षात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा अनुदानाचा लाभ मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!