फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! एक ऑगस्ट 2025 पासून लागू होणार नवीन नियम

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एनपीसीआयने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला आहे.

Published on -

UPI New Rules : यूपीआय वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून अर्थातच एक ऑगस्ट 2025 पासून यूपीआय संदर्भातील काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. खरंतर अलीकडे फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा पेमेंट अँप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय.

या यूपीआय प्लॅटफॉर्ममुळे सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार फारच सोपे झाले आहेत. अलीकडे, भाजीविक्रेत्यांपासून ते मोठ-मोठ्या मॉल पर्यंत सगळीकडे यूपीआयने पेमेंट स्वीकारले जात आहेत.

अशा स्थितीत यूपीआयच्या नियमांमध्ये झालेले बदल देशभरातील करोडो नागरिकांवर परिणाम करणार आहेत. दरम्यान आता आपण यूपीआयच्या कोणत्या नियमांमध्ये बदल झाला आहे आणि याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार याचा थोडक्यात आढावा घेऊयात.

UPI च्या नियमांमध्ये काय बदल झालाय 

एनपीसीआयने यूपीआयच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता यूपीआय वापरकर्त्यांना दिवसातून फक्त 50 वेळा बँक बॅलन्स म्हणजे खात्यातील रक्कम तपासता येणे शक्य होणार आहे.

यापेक्षा जास्त वेळा खात्यातील रक्कम तपासता येणार नाही. याव्यतिरिक्त यूपीआय वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असणारे बँक अकाउंट सुद्धा दिवसांतून फक्त 25 वेळा पाहता येणार आहेत.

यूपीआयच्या नियमांमध्ये करण्यात आलेला हा बदल सिस्टम वरील अनावश्यक ट्रॅफिक कमी करण्याच्या अनुषंगाने लागू करण्यात येणार आहे.

एनपीसीआयच्या मते बँक बॅलन्स चेक करणे तसेच बँक अकाउंट चेक करण्यासारख्या सेवांमुळे सेवेचा वेग मंदावतो आणि आउटेज होण्यासारख्या गोष्टी घडत असतात. याच कारणांमुळे एनपीएससीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

खरे तर याचा युपीआय वापरकर्त्यांवर फारसा परिणाम होणार नाही. कारण की आपल्यापैकी फारच कमी जण एका दिवसात 50 वेळा बँक बॅलन्स चेक करत असते.

आणि एका दिवसात 25 वेळा बँक अकाउंट पाहणाऱ्यांची संख्या देखील बोटावर मोजण्या इतकी असेल. त्यामुळे या बदललेल्या नियमांमुळे ग्राहकांवर फारसा काही परिणाम होणार नाही. कारण की यूपीआय द्वारे ग्राहकांना आधी प्रमाणे पेमेंट करता येणार आहे.

म्हणजेच यूपीआयच्या व्यवहाराची मर्यादा तेवढीच आहे. जी की बहुतेक प्रकरणांमध्ये प्रति ट्रांजेक्शन एक लाख रुपयांपर्यंत आहे आणि वैद्यकीय तसेच शैक्षणिक कारणांसाठी प्रति ट्रांजेक्शन पाच लाख रुपयांपर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!