शिर्डीच्या साईबाबाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे साईभक्त आक्रमक, गायकवाड विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

Published on -

शिर्डी- साईबाबांचा डी.एन.ए. चेक करा, असे आक्षेपार्ह विधान करून धार्मिक भावना दुखावल्या तसेच वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रूत्व द्वेष भाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्याप्रकरणी लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अरुण गायकवाड यांच्याविरोधात शिर्डी येथील कैलासबापू कोते यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून शिर्डी पोलिसांनी गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्री साईबाबा हे जगाचे दैवत आहे, सर्व हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत म्हणून लोक श्री साईबाबांना पुजतात (दि. २९) जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अरुण शंकर गायकवाड (रा. शिर्डी) यांनी लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना साईबाबांचा डी. एन.ए चेक करा, असे आक्षेपार्ह विधान करून आम्हा हिंदू धर्मियांचे धार्मिक भावना दुखावल्या आहे.

तसेच सदर विधानामुळे वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रुत्व द्वेष भाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याचा अरुण गायकवाड यांचा उद्देश असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मी तसेच गावातील शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते, अभय शेळके, सचिन तांबे, निलेश कोते, बाबासाहेब कोते, सर्जेराव कोते, संजय शिंदे, नितीन कोते, ताराचंद कोते, सुजित गोंदकर, संदीप सोनवणे, दीपक वारोळे, योगेश जगताप, प्रमोद गोंदकर, कैलास आरणे, किरण बर्डे, अविनाश गोंदकर, प्रसाद लोढा, विकास गोंदकर, अनुप गोंदकर, राजेंद्र भुजबळ, गणेश कोते, सचिन कोते, नरेश सुराणा, विनोद गोंदकर, वीरेश चौधरी, प्रतीक शेळके यांच्यासह इतर बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल आम्ही सर्वांनी वरील धर्मविरोधी विधानाचा निषेध नोंदविला आहे.

गायकवाड यांनी हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने तसेच वेगवेगळ्या वर्गामध्ये शत्रुत्व द्वेषभाव किंवा दुर्भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने बुद्धीपुरस्पर साईबाबांचा डी.एन.ए. चेक करा, असे आक्षेपार्ह विधान केले आहे, असे कैलास कोते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!