अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर

Published on -

श्रीरामपूर- अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी विदेशात पदव्युत्तर पदवी व पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी यापुढे शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत वेगवेगळ्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन स्वरूपात हे अर्ज मागविण्यात आले आहे. योजनेची सविस्तर माहिती व जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख (दि. १) ऑगस्ट असून विद्याथ्यर्थ्यांनी आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्याच्या पत्त्यावर आपापले अर्ज पाठवावेत, असे आवाहन ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हाध्यक्ष अन्वर तांबोळी, संगमनेर कार्याध्यक्ष शफी तांबोळी, इकबाल काकर, अबुभाई कुरेशी, हुसेन बागवान, मेहबूब मुलाणी, शफीक आत्तार, वाहेद कुरेशी, कादर कुरेशी, लतीफ आत्तार, अल्लाबक्ष मणियार, बाबा मणियार, उस्मान तांबोळी, गौस तांबोळी, बशीर मुलाणी, अमीर कुरेशी, मुस्ताक रंगरेज, साजिद मणियार, शकील काकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!