ब्रेकिंग ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘हे’ 5 नियम बदलणार, थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार

देशभरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऑगस्ट महिन्यात काही नियमांमध्ये बदल होणार आहे.

Published on -

August Rule Change : आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात होईल. खरंतर ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा होणार आहे. यामुळे सगळीकडे अगदीच उत्साहाचे वातावरण राहणार आहे. पण, एक ऑगस्ट 2025 पासून काही नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डच्या आणि यूपीआयच्या नियमांमध्ये बदल होणार आहे.

याव्यतिरिक्त गॅस सिलेंडरचे रेट सुद्धा बदलतील आणि सीएनजी आणि पीएनजीच्या रेट मध्येही बदल होणार आहेत. अशा स्थितीत आता आपण एक ऑगस्ट 2025 रोजी कोणकोणते नियम बदलणार? एलपीजी, सीएनजी, पीएनजीच्या रेट मध्ये कसे बदल होणार याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार : प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतो. त्यानुसार एक ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर आहेत.

परंतु व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती चेंज होत आहेत. जुलै महिन्यात व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमती साठ रुपयांनी कमी झाल्या होत्या. पण आता ऑगस्ट महिन्यात काय होतं? 14.2 किलो वजनी घरगुती गॅस सिलेंडर किंवा 19 किलो वजनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत काही बदल होणार का? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

एटीएफच्या किमतीत बदल होणार : एटीएफ म्हणजेच एअर टर्बाइन फ्युलचे रेट सोप्या भाषेत बोलायचं झालं तर विमानाच्या इंधनाचे रेट एक ऑगस्ट 2025 पासून चेंज होण्याची शक्यता आहे. एकतर याचे रेट वाढू शकतात कमी होऊ शकतात किंवा स्थिर राहू शकतात.

जर याचे रेट वाढले तर विमानाचे तिकीट दर सुद्धा वाढण्याची शक्यता आहे आणि जर याचे रेट कमी झाले तर साहजिकच विमान प्रवास पुढील महिन्यात स्वस्त होण्याची शक्यता आहे.

सीएनजी – पीएनजीचे रेट बदलणार : एटीएफ अन एलपीजी गॅसप्रमाणेच सीएनजी आणि पीएनजीचे रेट सुद्धा एक ऑगस्ट 2025 पासून बदलणार आहेत. खरंतर एप्रिल 2025 पासून सीएनजीचे आणि पीएनजीचे रेट बदललेले नाहीत मात्र यात पुढील महिन्यात बदल होण्याची दाट शक्यता आहे.

क्रेडिट कार्डचे नियम बदलणार : एसबीआय आपल्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर दिली जाणारी मोफत हवाई अपघात विमा बंद करणार अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या नव्या निर्णयाची अंमलबजावणी 11 ऑगस्ट पासून सुरु होईल. 

UPI चे नियम सुद्धा चेंज होणार : एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीएससी संबंधित काही नियम चेंज केले आहेत. नव्या नियमानुसार आता यूपीआय वापरकर्त्यांना यूपीआय एप्लीकेशनच्या माध्यमातून जसे की फोन पे, गुगल पे,

पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्मवर दिवसाला फक्त 50 वेळा बँक बॅलन्स चेक करता येणार आहे. तसेच मोबाईल नंबरशी लिंक असणारे बँक खाते देखील दिवसाला फक्त 25 वेळा पाहता येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!