भारतीय संस्कृतीत सोनं हे संपत्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. घराघरात आई-आज्जींच्या दागिन्यांपासून ते नवविवाहित वधूच्या साजशृंगारापर्यंत सोन्याला खास स्थान असतं. पण ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिलं, तर हेच सोनं काही विशिष्ट राशींसाठी शुभ नसतं, उलट त्यांचे जीवन अडचणींनी भरून जातं. हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण अनेक ज्योतीषशास्त्रज्ञांचा यावर ठाम विश्वास आहे.

वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांनी सोन्याचा अति उपयोग टाळायला हवा, असं सांगितलं जातं. त्यांच्या राशीवर शुक्राचा प्रभाव अधिक असतो, आणि सोने हे सूर्याशी संबंधित धातू असल्याने दोघांचा संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे या राशीचे लोक जर सतत सोनं परिधान करत असतील, तर त्यांना आर्थिक नुकसान, मानसिक अस्वस्थता, आणि लवकर राग येणं यासारख्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही लोक यामुळे सतत पैशाच्या अडचणीत अडकतात.
मिथुन राशी
मिथुन राशीचा स्वभावधर्म हे सतत हालचालीत राहणं आणि तर्कशुद्ध विचार करणं असतं. पण सोने घातल्याने त्यांच्या मन:शक्तीत गोंधळ निर्माण होतो, असं मानलं जातं. यामुळे त्यांचं आरोग्य बिघडू शकतं, विशेषतः त्वचेशी संबंधित त्रास निर्माण होण्याची शक्यता वाढते. शिवाय, सोनं त्यांच्यासाठी आर्थिक अडचणी घेऊन येऊ शकतं, असंही काही अनुभव सांगतात.
मकर राशी
मकर राशीचे लोक परिश्रमी, काटेकोर आणि निर्णयक्षम असतात. मात्र, सोन्याचा प्रभाव त्यांच्या निर्णय क्षमतेला गोंधळात टाकतो, असं काही अभ्यासक मानतात. सोने घातल्याने त्यांच्या आयुष्यात नकारात्मकता वाढू लागते, निर्णय घेण्यात चुकतात आणि याचा परिणाम त्यांच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनावरही होतो. काही लोकांमध्ये यामुळे एकप्रकारची नैराश्याची छाया दिसून येते.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांबाबत सांगायचं झालं, तर त्यांच्या स्वभावात आधीच एक स्वतंत्रपणाची, कधी कधी हट्टीपणाची झलक असते. अशा लोकांनी जर सतत सोनं घातलं, तर त्यांच्या स्वभावात असंतुलन वाढू शकतं. रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात, घरात वादविवाद वाढतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावरही होतो.
या सगळ्या गोष्टी ऐकून असं वाटू शकतं की मग सोनं कुणी घालावं? पण ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. काहींच्या राशीसाठी सोनं अत्यंत लाभदायक ठरतं, तर काहींसाठी त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून सोनं घालण्याआधी केवळ त्याचा सौंदर्यदृष्टिकोन न पाहता, त्यामागचा अध्यात्मिक आणि ग्रहांचा विचार करणं देखील गरजेचं ठरतं.