SIP मध्ये गुंतवणूक करताना 20×12×20 चा फॉर्म्युला वापरा ! 40व्या वर्षी मिळणार 1.83 कोटी, करोडपती होण्याचा सर्वाधिक सोपा मार्ग

Published on -

SIP Investment Tips : जर तुम्हाला शेअर मार्केटमधील जोखीम नको असेल तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट राहणार आहे. अनेकांना शेअर मार्केट मधील रिस्क धोक्याची वाटते आणि म्हणूनच असे गुंतवणूकदार शेअर मार्केटशी संलग्न असणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करण्याचा प्लॅन बनवतात.

दरम्यान जर तुम्हालाही म्युच्युअल फंड मधून कोणत्याही रिस्कविना करोडो रुपयांचा फंड तयार करायचा असेल तर तुमच्यासाठी एसआयपीचा 20×12×20 हा फॉर्म्युला फारच उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान आता आपण हा फार्मूला नेमका कसा काम करतो आणि याचा उपयोग करून सर्वसामान्य नागरिक देखील कशा पद्धतीने करोडपती होऊ शकतात याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

20×12×20 फॉर्मुला कसा काम करतो?

या योजनेत तीन गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असतात. या फॉर्मुलातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एसआयपी मध्ये दरमहा 20 हजार रुपये गुंतवावे लागतील. दुसरी गोष्ट म्हणजे एसआयपी मधूनच तुम्हाला सरासरी 12% रिटर्न मिळू शकतात असे आपण गृहीत धरू. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एसआयपी मध्ये सलग 20 वर्ष गुंतवणूक करावी लागणार आहे.

अर्थात जर तुम्ही एस आय पी मध्ये प्रत्येक महिन्याला वीस हजार रुपयांची गुंतवणूक वीस वर्षांसाठी सुरू ठेवले आणि त्यावर तुम्हाला 12% दराने रिटर्न मिळाले तर तुम्ही वीस वर्षांनी एकूण 1.83 कोटी रुपयांची कमाई करू शकता.

यामध्ये तुमची गुंतवणूक 48 लाख रुपयांची राहणार आहे आणि तुम्हाला या गुंतवणुकीवर जवळपास एक कोटी 35 लाख रुपये इतके रिटर्न मिळणार आहेत. 

SIP कशी काम करते ? 

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचे मुख्यता दोन प्रकार असतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे एक रकमे ज्याला Lumpsum म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे एसआयपी किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन.ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही दरमहा म्युच्युअल फंडात एक निश्चित रक्कम गुंतवता.

म्युच्युअल फंडाचे वेगवेगळे प्रकार आहेत पण इक्विटी म्युच्युअल फंड हा एक लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास सरासरी 12% दराने रिटर्न मिळते. हे रिटर्न चक्रवाढीसह मिळत असल्याने, कालांतराने तो वेगाने वाढतो.

एसआयपी इक्विटी म्युच्युअल फंडांवर सुद्धा शेअर मार्केटचा प्रभाव असतो. पण जे लोक एसआयपी मध्ये लॉंग टर्म साठी गुंतवणूक करतात म्हणजेच 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक करतात त्यांची रिस्क मोठ्या प्रमाणात कमी होते.

लॉंग टर्म मध्ये एसआयपी मधून चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता असते. म्हणूनच जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये एसआयपी करायची असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून करोडो रुपयांची कमाई करू शकणार आहात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!