Suzlon Energy Share Price:- आज 1 ऑगस्ट 2025 रोजी जेव्हा शेअर मार्केट ओपन झाले तेव्हा अगदी सुरुवातीपासून बीएससी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली. परंतु या घसरणीनंतर आता परत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काहीसा बूम पाहायला मिळत असून सेन्सेक्समध्ये 115 अंकांची सुधारणा झालेली दिसून येत आहे व निफ्टी मध्ये देखील 14.61 अंकांची सुधारणा दिसून येत आहे. सध्या जर आपण बीएसई सेन्सेक्सची स्थिती बघितली तर तो 0.14% वधारला असून सध्या 81306.43 वर पोहोचला आहे.
तर निफ्टीमध्ये देखील 0.01% ची सुधारणा दिसून येत असून सध्या निफ्टी 24771 वर पोहोचली आहे. मात्र अजून पर्यंत बाजारातील प्रमुख निर्देशांक जसे की बँक निफ्टीमध्ये मात्र -0.26% ची घसरण झाली असून 55815.65 वर असल्याचे दिसून येत आहे तर निफ्टी नेक्स्ट 50 या प्रमुख निर्देशांकामध्ये देखील -0.32% ची घसरण पाहायला मिळत आहे व सध्या 66,882.05 वर पोहोचला आहे. तीच परिस्थिती निफ्टी मिडकॅप 100 मध्ये देखील दिसून येत आहे.

1 ऑगस्ट 2025 रोजीची सुजलॉन एनर्जी शेअरची स्थिती काय?
आज बाजार उघडल्यापासून सुजलॉन एनर्जी शेअरची किंमत वधारल्याचे दिसून आले असून त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या जर आपण बघितले तर या शेअर्समध्ये 4.74 टक्क्यांची वाढ झाली असून सध्या हा शेअर्स 64.52 ट्रेड करत आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत या शेअरच्या किमतीमध्ये +2.92 अंकांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सुजलॉन एनर्जी शेअरची सध्याची नीचांकी पातळी बघितली तर ती 62 रुपये असून उचांकी पातळी 66 रुपये इतकी आहे. इतकेच नाही तर 52 आठवड्यातील उचांकी पातळी 86 रुपये आणि नीचांकी पातळी 46 रुपये इतकी राहिली आहे.
आतापर्यंत या शेअर्सने दिलेले रिटर्न किती?
सुजलोन एनर्जी शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा जर बघितला तर तो काहीसा समाधानकारक आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर एक वर्षांमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांना -7%, सहा महिन्याच्या कालावधी +10.92%, तीन महिन्याच्या कालावधीत +14.4% आणि एक महिन्याच्या कालावधीत -4.73% परतावा दिलेला आहे. या आकडेवारीवरून दिसून येते की दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुजलॉन एनर्जी शेअर्स उत्तम आहे. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप हे 88405 कोटी रुपये इतके आहे.