‘हे’ आहेत शेअर मार्केटपेक्षा जास्तीचे रिटर्न देणारे टॉप 3 Flexi Cap म्युच्युअल फंड !

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणार आहात का ?मग तुमच्यासाठी फ्लेक्सी कॅप फंड हा एक बेस्ट पर्याय ठरणार आहे. दरम्यान आज आपण गेल्या पाच वर्षात सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या टॉप 3 फ्लेक्सी कॅप फंडबाबत डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. 

Published on -

Mutual Fund : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे तुम्हालाही रिस्की वाटते का ? मग तुमच्यासाठी म्युच्युअल फंड चा पर्याय बेस्ट राहणार आहे. म्युच्युअल फंड सुद्धा शेअर मार्केटशी संबंधित आहेत पण यामध्ये शेअर मार्केट एवढी रिस्क नसते. म्हणून जर तुम्हाला कमी जोखीम आणि उच्च रिटर्न हवे असतील तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांच्या काळात काही फ्लेक्सी कॅप फंडने शेअर मार्केटच्या तुलनेत अधिकचे रिटर्न दिले आहेत. फ्लेक्सी कॅप फंड म्हणजे असे Mutual Fund जे स्मॉल, मिड आणि लार्ज सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

फ्लेक्सी कॅप फंडचे फंड मॅनेजर परिस्थितीनुसार आपल्या गुंतवणुकीच्या रणनीतीमध्ये बदल करतो. यामुळे हे फंड अनेकदा अधिकचे रिटर्न देतांना दिसतात. आता आपण गेल्या पाच वर्षांमध्ये शेअर मार्केट पेक्षा जास्तीचे रिटर्न देणारे टॉप 3 फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड बाबत माहिती पाहणार आहोत.

हे आहेत Top 3 Flexi Cap Fund

Bank of India Flexi Cap Fund : या यादीत बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंड तिसऱ्या स्थानी आहे. या फंड ने वार्षिक 28.39% दराने रिटर्न दिले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात या फंडने 223 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

म्हणजे पाच वर्षांपूर्वी जा गुंतवणूकदारांनी या फंडमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता तीन लाख 23 हजार रुपये इतके झाले आहे.

HDFC Flexi Cap Fund : या यादीत दुसऱ्या स्थानी एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडचा नंबर लागतो. या फंडने वार्षिक 29.34% दराने रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल बनवले आहे. गेल्या पाच वर्षात या फंडने 251 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

म्हणजेच पाच वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या फंडमध्ये एक लाखाची गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 3 लाख 51 हजार रुपये इतके झाले आहे. 

Quant Flexi Cap Fund : क्वांट फ्लेक्सी कॅप फंड या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या फ्लेक्सी कँप फंडने आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक रिटर्न दिले असल्याची माहिती तज्ञांकडून समोर आली आहे. या फंडने गेल्या पाच वर्षात वार्षिक 31.07% दराने रिटर्न दिले आहेत.

गेल्या पाच वर्षात या फंडने 270 टक्क्यांचे रिटर्न दिले आहे. म्हणजे पाच वर्षांपूर्वी ज्यांनी या फंडमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील त्याचे मूल्य आता तीन लाख 70 हजार रुपये इतके झाले असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!