गूगल भारतात 526 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार ! ‘या’ शहरात विकसित करणार आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर

एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी भारताविरोधात ट्रेड वॉर सुरू केले आहे. मात्र अशा या स्थितीत गूगल भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Published on -

Google Investment News : सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धामुळे तसेच इजराइल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे काही देशांचे परस्परांमधील संबंध खराब झाले आहेत. त्यातल्या त्यात अमेरिकेने टेरिफ वॉर सुरू केले आहे. यामुळे भारताचे आणि अमेरिकेचे व्यापारी संबंध ताणले गेले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री संपूर्ण जगाला ठाऊक आहे. मात्र असे असतानाही ट्रम्प भारताविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत आणि यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध आणखी खराब होत चालले आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी एप्पलला भारतातील प्रोडक्शन कमी करण्याचा धमकीवजा इशारा दिला होता.

मात्र एप्पलने भारतातील प्रोडक्शन ट्रम्प यांच्या धमकीनंतर आणखी वाढवले आहे. दरम्यान अलीकडे ट्रम्प यांनी अमेरिकन कंपन्यांना भारतातून इंजिनियरची भरती करू नका असे सांगत दोन्ही देशांमध्ये संबंधात मिठाचा खडा टाकण्याचे काम केले आहे.

तसेच ते अमेरिकन कंपन्यांना अमेरिकेतच गुंतवणूक करण्यावर प्रोत्साहन कमी आणि दबावतंत्राचा अधिक वापर करत आहेत. मात्र अशी सगळी परिस्थिती असतानाच भारतासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे गुगल भारतात तब्बल 526 अब्ज रुपयांची म्हणजेच सहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

या गुंतवणुकीतून आशिया खंडातील सर्वाधिक मोठे डेटा सेंटर हिंदुस्थानात उभारले जाणार आहे. आकाराने आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हे आशिया खंडातील सर्वाधिक मोठे डेटा सेंटर राहणार आहे आणि यामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल अशी आशा आहे. 

 कोणत्या शहरात विकसित होणार गुगलचे डेटा सेंटर 

 खरे तर गुगलकडून भारतात 526 अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण जर मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर google ही गुंतवणूक आंध्रप्रदेश मध्ये करणार आहे.

आंध्र प्रदेश मधील विशाखापटनम येथे गुगलचे आशिया खंडातील सर्वाधिक मोठे डेटा सेंटर विकसित होणार आहे. विशेष बाब अशी की या डेटा सेंटरसाठी जी वीज लागणार आहे त्यासाठी रिन्यूएबल एनर्जी मध्ये google कडून तब्बल दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल अशी सुद्धा माहिती दिली जात आहे.

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी गुगलची पेरेंट कंपनी म्हणजेच अल्फाबेटने यावर्षी डेटा सेंटरमध्ये गुगल 75 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणारा असल्याचे सांगितले होते. यानंतर आता गुगल भारतात सहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. 

गुगल आणि आंध्र प्रदेश सरकारचे म्हणणे काय?

प्रसार माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की google भारतात आशिया खंडातील सर्वाधिक मोठे डेटा सेंटर विकसित करणार आहे. मात्र प्रत्यक्षात गुगलकडून या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दुसरीकडे अजून आंध्रप्रदेश सरकारने देखील या गुंतवणुकीबाबत कोणतीच घोषणा अथवा माहिती दिलेली नाही.

यामुळे गुगल खरंच आंध्र प्रदेश मध्ये एवढी मोठी गुंतवणूक करणार का? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. पण जर सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या सत्यात उतरल्यात तर नक्कीच याचा आंध्रप्रदेशच्या विकासासाठी आणि परिणामी देशाच्या विकासासाठी मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!