Post Office Scheme : पोस्टाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल आणि तुम्हाला लॉंग टर्म साठी गुंतवणूक करायची असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरंतर अलीकडे गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे.
कारण म्हणजे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतोय. तथापि शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही पूर्णपणे जोखीम पूर्ण असते आणि म्हणूनच काही लोक चांगला फायदा मिळत असला तरी देखील तिकडे गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत नाहीत.

जर तुम्हीही जोखीमपूर्ण गुंतवणुकीच्या विरोधात असाल आणि तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय सर्वाधिक बेस्ट राहणार आहे. दरम्यान आज आपण पोस्टाच्या सर्वाधिक लोकप्रिय योजनेची माहिती पाहणार आहोत.
ही आहे पोस्टाची सर्वाधिक लोकप्रिय योजना
पोस्टाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या बचत योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यातील एक लोकप्रिय बचत योजना म्हणजेच टाईम डिपॉझिट योजना, ज्याला टीडी योजना किंवा पोस्टाची एफडी योजना म्हणूनही ओळखले जाते.
या योजनेचे स्वरूप बँकांच्या एफडी योजनेसारखेच आहे आणि म्हणूनच याला पोस्टाची एफडी योजना असे म्हणतात. ही योजना एक, दोन, तीन आणि पाच वर्ष कालावधीची आहे.
पोस्टाच्या एफडी योजनेचे व्याजदर कसे आहे?
पोस्टकडून प्राप्त माहितीनुसार, एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या स्थितीला 6.90% दराने व्याज दिले जात आहे. दोन वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सात टक्के दराने व्याज दिले जात आहे.
तीन वर्षांच्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने व्याज दिले जात आहे. तसेच पाच वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पोस्टकडून 7.50% दराने व्याज दिले जात आहे.
3 वर्षांसाठी 2 लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 36 महिन्यांच्या एफडी योजनेत म्हणजेच पोस्टाच्या तीन वर्षांच्या एफडी योजनेत दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला सध्याच्या 7.10% दराने दोन लाख 45 हजार 562 रुपये मिळणार आहेत. म्हणजे दोन लाखाच्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना 45,562 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.