HDFC Mutual Fund : गेल्या काही वर्षांपासून देशात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. म्युच्युअल फंड मध्ये अनेकजण इक्विटी स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत. जर तुम्हीही एखाद्या फंड हाऊसच्या इक्विटी स्कीम मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या टॉप 5 इक्विटी स्कीम फायद्याच्या ठरणार आहेत.
कारण एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या टॉप 5 इक्विटी स्कीम गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळवून देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत एचडीएफसीच्या या संबंधित इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एक रकमी गुंतवणुकीवर गेल्या 5 वर्षात जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत.

या इक्विटी फंड स्कीममध्ये करण्यात आलेली Lumpsum गुंतवणूक गेल्या पाच वर्षांच्या काळात तब्बल 4.8 पटीने वाढली आहे. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्हणजे एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतूनही गुंतवणूकदारांना वार्षिक 24% पासून ते 30 टक्क्यांपर्यंतचे रिटर्न मिळाले आहेत.
HDFC म्युच्युअल फंडच्या टॉप 5 इक्विटी स्कीम
एचडीएफसी फ्लेक्सी कैप फंड : या फंडमध्ये पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेली एक लाख रुपयांची गुंतवणूक 3.67 लाख रुपये इतकी झाली आहे. म्हणजे एकरकमी रकमेवर गेल्या पाच वर्षांमध्ये सरासरी वार्षिक 29.67% दराने रिटर्न मिळाले आहेत.
तसेच पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या दहा हजार रुपयांच्या एसआयपीचे मूल्य आता दहा लाख 98 हजार 31 रुपये इतके झाले आहे यातील एकूण गुंतवणूक सहा लाख रुपयांची आहे. म्हणजे एसआयपी करणाऱ्यांना देखील गेल्या पाच वर्षांच्या काळात वार्षिक 24.45 टक्के दराने परतावा मिळाला आहे. या फंडचे खर्चाचे प्रमाण 0.72% इतके आहे.
एचडीएफसी फोकस्ड फंड : या फंडने लम्सम म्हणजे एकरकमी गुंतवणुकीवर पाच वर्षात वार्षिक 29.75 टक्के दराने रिटर्न दिले आहेत. त्याचवेळी एसआयपी करणाऱ्यांना वार्षिक 25.57% दराने रिटर्न मिळाले आहेत. म्हणजे या फंडमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी करण्यात आलेली एक लाख रुपयांची गुंतवणूक आता 3.68 लाख रुपये इतकी झाली आहे. दहा हजार रुपयांच्या एसआयपीचे पाच वर्षातील मूल्य 11.28 लाख इतके झाले आहे. यामध्ये सहा लाख रुपये गुंतवणूक आहे.
एचडीएफसी मिड कैप फंड : या फंडने एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 32.58% दराने रिटर्न दिले आहेत. एसआयपी वर देखील वार्षिक 26.92% दराने रिटर्न मिळाले आहेत. म्हणजे पाच वर्षांपूर्वी ज्यांनी या फंडात एक लाखाची गुंतवणूक केली होती त्यांना आता 4.1 लाख मिळणार आहेत. आणि पाच वर्षांपूर्वी ज्यांनी 10 हजाराची एसआयपी सुरू केली होती त्यांच्या एसआयपी चे मूल्य आता 11.64 लाखांपर्यंत पोहोचले आहे. पण यामध्ये गुंतवणूकदाराची गुंतवणूक सहा लाखांची आहे.
एचडीएफसी स्मॉल कैप फंड : एकरकमी गुंतवणुकीवर या फंडने गेल्या पाच वर्षांच्या काळात वार्षिक 34.63% दराने रिटर्न दिले आहेत. म्हणजे पाच वर्षांपूर्वी ज्यांनी या फंडमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते त्यांना आता 4.42 लाख रुपये मिळणार आहेत. या फंडमध्ये एसआयपी करणाऱ्यांना देखील 25.79% दराने रिटर्न मिळाले आहेत.
एचडीएफसी इंफ्रास्ट्रक्चर फंड : एकरकमी गुंतवणुकीवर या फंडने गेल्या पाच वर्षांच्या काळात वार्षिक 36.83% दराने रिटर्न दिले आहेत. म्हणजे पाच वर्षांपूर्वी ज्यांनी या फंडमध्ये एक लाख रुपये गुंतवले होते त्यांना आता 4.8 लाख रुपये मिळणार आहेत.
या फंडमध्ये एसआयपी करणाऱ्यांना देखील 25.79% दराने रिटर्न मिळाले आहेत. म्हणजे पाच वर्षांमधील दहा हजाराच्या एसआयपीचे मूल्य 12.62 लाख रुपये इतके झाले आहे. मात्र यामध्ये सहा लाख रुपये गुंतवणूकदाराची गुंतवणूक आहे.