अकोले तालुक्यात ग्राम रक्षक दलाने उद्धवस्त केले गावठी दारूचे अड्डे

Published on -

अकोले- अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या आदेशानंतर अवैध दारूला आळा बसावा यासाठी तालुक्यात ग्राम रक्षक दलांची स्थापना करण्यात येत आहे. काल तालुक्यातील म्हाळादेवी येथे बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेतच ग्राम रक्षक दलाची स्थापना करण्यात आली. या ग्रामरक्षक दलाने स्थापना होताच गावातील अवैध देशी, गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला.

म्हाळादेवी येथे ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे संदर्भात काल विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष ग्रामसभेमध्ये गावातील अवैधरित्या सुरु असलेल्या दारू व्यवसायाबाबत प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थ व महिलांनी तीव्र प्रतिक्रिया मांडल्या.

त्यामुळे गावातील अवैध दारू व्यवसाय तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊन विषयपत्रिकेवरील प्रथम विषयानुसार ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे संदर्भात चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र ग्रामसुरक्षा नियम-२०१७ तरतुदीनुसार ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचे नियम, अटी, अधिकार, निवड करण्याची पध्दत समजावून सांगण्यात आली. कार्यकारिणी निवडीनंतर त्यांना मदत करण्यासाठी निमंत्रीत म्हणून १४ सरस्यांची निवड करण्यात आली.

यावेळी गावातील अवैध दारु व्यवसाय – करणाऱ्या कुटुंबांच्या शासकिय सुविधा स्थगित करण्या संदर्भात निर्णय घेण्यात – आला. या सभेस मोठ्या संख्येने महिला, तरुणवर्ग व ग्रामस्थ उपस्थित – होते. सभा संपताच उपस्थित सर्व ग्रामस्थांनी एकमताने निर्णय घेत अवैध दारू व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचे – ठरले. त्यानुसार सर्व ९० ते १०० – लोकांचा जमाव दारुचा अड्डा उद्ध्वस्त करायला गेला.

तेथे अवैध दारू विक्री न करण्याबाबत सुचना करून नंतर ठाकरवाडी येथील शेडमध्ये असलेल्या देशी दारूच्या बाटल्या फोडून पत्र्याचे शेड उद्ध्वस्त करण्यात आले. एका महिलेच्या घरातून गावठी दारूचे ड्रम मिळून आल्याने सर्व मुद्देमाल एकत्र करून अकोले पोलिसांसमक्ष पंचनामा करण्यात आला व दारू व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सक्त ताकीद देण्यात आली.

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली असून अवैध दारू विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. गावातील दारू अड्डे ग्रामस्थानी उद्ध्वस्त केले. भविष्यातही गावातून अवैध दारू हद्दपार केली जाईल.
– सरपंच प्रदीप हासे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!