7th Pay Commission : सातवा वेतन आयोगाचा शेवट गोड होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जाता जाता मोठा लाभ देऊन जाईल. कारण की रक्षाबंधनाच्या आधी पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात येणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 55 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.
ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू आहे. मार्च 2025 मध्ये केंद्रातील सरकारने महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला आणि महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के करण्यात आला. आता पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे.

किती वाढणार महागाई भत्ता?
महागाई भत्ता वाढ एआयसीपीआयच्या निर्देशांकानुसार ठरत असते. जानेवारी महिन्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला. आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.
जानेवारी ते जून 2025 या कालावधीमधील एआयसीपीआयच्या निर्देशांकानुसार ही महागाई भत्ता वाढ ठरणार आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय हा रक्षाबंधनाच्या आधी निर्गमित होण्याची शक्यता आहे.
खरंतर दरवर्षी जुलै महिन्यापासून ची महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय हा दसरा किंवा दिवाळीच्या आसपास होतो. मात्र यावर्षी रक्षाबंधनाच्या आधीच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे. कारण की एआयसीपीआयचे जून महिन्याचे निर्देशांक नुकतेच समोर आले आहेत.
म्हणजे आता जानेवारी ते जून या कालावधी मधील एआयसीपीआयचे निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यात एआयसीपीआयचे निर्देशांक 143.2 इतके होते. फेब्रुवारीत हे निर्देशांक 142.8, मार्चमध्ये 143, एप्रिलमध्ये 143.5, मे मध्ये 144 आणि जून मध्ये 145 असे राहिलेत.
यानुसार जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे बोलले जात आहे. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे जुलै 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% वरून 58% इतका होणार आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कम पण मिळणार?
यासंदर्भातील अधिकृत निर्णय हा येत्या रक्षाबंधनाच्या आधी निघणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पगारा सोबत अर्थात जो पगार कर्मचाऱ्यांना सप्टेंबर मध्ये मिळेल त्या पगारांसोबत त्यांना वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ सुद्धा मिळणार आहे.
ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना एका महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळेल. तथापि या संदर्भातील निर्णय रक्षाबंधनाच्या आधीच घेतला जाईल याबाबत सरकारकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. म्हणून खरंच या संदर्भातील जीआर रक्षाबंधनाच्या आधीच निघणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.