राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेणारा पती-पत्नीला अटक, चार दिवसाची पोलिस कोठडी

Published on -

राहुरी- राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय योजना मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात ताज निसार पठाण व रुबीना ताज पठाण या पती-पत्नींना अटक करण्यात आली आहे. शासनाची फसवणूक करणाऱ्या या साखळीचा तपास पोलीस करत असून, यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागाचीही शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६१३/२०२५ नुसार भारतीय दंड विधान कलम ४६८ व ४७१ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात ताज निसार पठाण व रुबीना ताज पठाण या पती-पत्नींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून संजय गांधी निराधार योजना व अन्य दिव्यांग लाभ योजनांचा गैरवापर करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी दीपक नामदेव साळवे (देवळाली प्रवरा) यांनी फिर्याद दाखल केली होती.

गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आरोपी ताज निसार पठाण व रुबीना ताज पठाण यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता
पाटील यांनी बाजू मांडली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, कॉन्स्टेबल गणेश लिपणे, वृषाली कुसळकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक राजू जाधव, हेड कॉन्स्टेबल राहुल यादव, कॉन्स्टेबल शेषराव कुटे, अंजली गुरव आणि पोलीस नाईक संतोष दरेकर यांनी केली आहे.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

पोलीस तपासादरम्यान आरोपींकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र कसे व कोठून बनवण्यात आले, याची माहिती घेतली जात असून, या बनावट प्रमाणपत्रांच्या मूळ सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटल व इतर शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी या प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, संबंधितांवर कारवाई होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!