खुशखबर….! पुणे-रीवा नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगरमार्गे धावणार, उद्या रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, कस असणार वेळापत्रक ?

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे कडून महाराष्ट्रातील पुणे आणि मध्य प्रदेशातील रीवा दरम्यान नवीन एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. 

Published on -

Pune Railway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे ते रिवादरम्यान सुरू करण्यात येणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगर मार्गे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अहिल्यानगर मधून थेट मध्य प्रदेश ला जाता येणार आहे आणि ही नगरमधून थेट मध्य प्रदेशात जाणारी पहिलीच एक्सप्रेस ट्रेन ठरणार आहे.

त्यामुळे या गाडीचा पुणेकरांप्रमाणेच नगरवासीयांना देखील मोठा फायदा होणार आहे. या गाडीला उद्या अर्थात 3 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

नव्या गाडीचे वेळापत्रक कसे असणार ?

पुणे आणि रिवादरम्यान सुरू करण्यात येणारे ही एक्सप्रेस ट्रेन या दोन्ही शहरादरम्यान धावणारी पहिलीच एक्सप्रेस गाडी राहणार आहे. यामुळे पुणे ते रीवा दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी ही नवीन गाडी नक्कीच फायद्याची राहील.

ही गाडी साप्ताहिक राहणार आहे म्हणजेच आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. ही ट्रेन पुण्यातून दर गुरुवारी आणि रीवा रेल्वे स्थानकातून दर बुधवारी सोडली जाणार आहे. यामुळे दोन्ही राज्यांमधील कृषी, शिक्षण, उद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे.

ही गाडी अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, कोपरगाव या स्थानकावर थांबा घेणार आहे. सोबतच या गाडीला विदर्भातील नागपूरसहीत अन्य महत्वाच्या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी अहमदनगर, मनमाड, वर्धा, नागपूर मार्गे मध्यप्रदेशात एन्ट्री करणार आहे.

या गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी पुण्यातून दर गुरुवारी 15.15 वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 17:30 वाजता ही गाडी रीवा रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच ही गाडी रिवा रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी पावणे सात वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पावणेदहा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. 

कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार 

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पुणे – रीवा एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील राज्यातील दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे आणि मध्य प्रदेशातील बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना या महत्त्वाच्या स्टेशनवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. 

Q : पुणे – रिवा एक्सप्रेस अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या स्थानकावर थांबा घेणार ?

A : पुणे – रिवा एक्सप्रेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर आणि कोपरगाव या दोन महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. 

Q : पुणे – रिवा एक्सप्रेसचा रूट कसा आहे ? 

A : पुणे – रिवा एक्सप्रेस दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया या रेल्वेस्थानकातून थेट मध्य प्रदेशातील बालाघाट मध्ये जाईल अन मग नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतनामार्गे रिवा स्थानकावर पोहोचणार आहे.

Q : पुणे – रीवा एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा कोण दाखवणार?

A : पुणे – रीवा एक्सप्रेस ट्रेनला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हिरवाज्यांना दाखवणार आहे.

Q : पुणे – रीवा एक्सप्रेस ट्रेनला कधी हिरवा झेंडा दाखवला जाणार?

A : या गाडीला उद्या अर्थात तीन ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकातून हिरवा झेंडा दाखवणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe