अहिल्यानगर- मालेगाव शहरात २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट घटनेत तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने निष्पापांना अडकवत मोठा अन्याय केला होता. मात्र, न्यायदेवता ही जागृत आहे. त्यामुळेच १७ वर्षांनी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
या निकालामुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी कॉग्रेस राजवटीचा खोटेपणा पुढे आला आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर शहर भाजपचे सरचिटणीस महेश नामदे यांनी केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी समीर कुलकर्णी व अजय राहीरकर यांना गुरवारी निर्दोष मुक्त करण्यात आले.
त्यानंतर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी अहिल्यानगर शहर भाजपाच्या वतीने दिल्लीगेट येथे न्यायालयाच्या या निर्णयाचे जल्लोषात फटाके वाजवून व भारतमातेचा जयजयकार करत स्वागत करण्यात आले. तसेच तत्कालीन काँग्रेस सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, ज्येष्ठ नेत्या कालिंदी केसकर, सावेडी
मंडल अध्यक्ष राजेंद्र काळे, भिंगार मंडल अध्यक्ष सचिन जाधव, बाळासाहेब गायकवाड, राहुल जामगावकर, गोपाल वर्मा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दीपक देरेकर, राजेंद्र फुलारे, वैभव झोटिंग, सुजित खरमाळे, रुद्रेश अंबाडे, अजित कोतकर, महेश गुगळे, सुनील सकट, भार्गव फुलारे, बाळासाहेब भुजबळ, संतोष गांधी, निरज राठोड, सुरेखा जंगम, सविता कोटा, सुनीता भांगे, पियुष तावरे, ज्ञानेश्वर धिरडे, सोनाली पाठक, डॉ. दर्शन करमरकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
खरा न्याय न्याय मिळाला…
राजेंद्र काळे म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कॉग्रेस सरकारने चुकीचा खटला दाखल करून अनेक हिंदुत्ववादींचे आयुष्य बरबाद केले. पण कालच्या निकालाने कॉग्रेसच्या खोट्या राजकारणाला मोठी चपराक बसली असून खरा न्याय सुप्रीम कोर्टाने दिला आहे, त्याबद्दल धन्यवाद.