India’s Safest Car : ऑगस्ट महिना सुरू झाला की देशात सणासुदीचा हंगामही सुरु होत असतो. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या सणासुदीच्या हंगामात नवीन गाडी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण भारतातील सर्वाधिक सुरक्षित कारची माहिती पाहणार आहोत.
साधारणता कार खरेदी करताना ग्राहक त्या गाडीचे डिझाईन रंग फीचर्स स्पेसिफिकेशन मायलेज अशा वेगवेगळ्या गोष्टी चेक करतात. पण अनेकजण गाडी किती सुरक्षित आहे? हे काही चेक करत नाहीत. मात्र गाडीच्या फीचर्स सोबतच त्या गाडीची सेफ्टी देखील तितकीच महत्त्वाचे आहे. दरम्यान भारतात ऑक्टोबर 2023 पासून गाडीची मजबुती तपासण्यासाठी नवीन प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे.

देशात Bharat NCAP हा क्रॅश टेस्ट प्रोग्राम सुरू करण्यात आला असून या प्रोग्रामच्या माध्यमातून आतापर्यंत 21 गाड्यांना सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. अशा स्थितीत आता आपण या प्रोग्राम मधून देशातील कोणत्या गाड्यांना फाईव्ह स्टार रेटिंग देण्यात आली आहे, याची माहिती पाहणार आहोत.
या आहेत देशातील सर्वाधिक सुरक्षित कार
Tata Nexon : देशातील सर्वाधिक सुरक्षित गाड्यांच्या यादीत Tata Nexon पेट्रोल व्हेरिएंटचा समावेश होतो. या गाडीला Bharat NCAP क्रॅश टेस्टिंग मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग देण्यात आली आहे. या कारला प्रौढ श्रेणीमध्ये 32 पैकी 29.41 गुण मिळाले आहेत आणि मुलांच्या श्रेणीमध्ये 49 पैकी 43.83 गुण मिळाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही सुरक्षित कार खरेदी करू इच्छित असाल तर ही गाडी तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे.
Tata Punch EV : भारतीय कार मार्केट मधील इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलबाला आहे. कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ मोठा स्ट्रॉंग आहे. कंपनीच्या टाटा पंच या इलेक्ट्रिक कारला क्रॅश टेस्टिंग मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे. म्हणजे ही देखील कंपनीची एक सुरक्षित कार आहे.
Tata Curvv EV : या यादीत टाटा कंपनीची Tata Curvv EV या गाडीचा देखील समावेश होतो. ही गाडी गेल्यावर्षी लॉन्च करण्यात आली होती. या गाडीला भारत NCAP क्रॅश टेस्टिंग प्रोग्राम मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे.
Mahindra XUV 3XO : भारतीय कार मार्केटमध्ये गेल्या वर्षी महिंद्रा कंपनीने Mahindra XUV 3XO ही कार लॉन्च केली. महिंद्रा ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी. कंपनीची XUV 3XO ही कार पूर्णपणे सुरक्षित आहे या गाडीला सुद्धा भारत NCAP क्रॅश टेस्टिंग प्रोग्राम मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे.
Mahindra XUV 400 EV : महिंद्रा कंपनीची ही लोकप्रिय इलेक्ट्रिक कार सुद्धा या यादीत समाविष्ट आहे. या गाडीला सुद्धा फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे.
Mahindra Thar Roxx : देशातील सर्वाधिक सुरक्षित गाड्यांच्या यादीत महिंद्रा कंपनीच्या Thar Roxx या गाडीला सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे. कारण की भारत NCAP क्रॅश टेस्टिंग प्रोग्राम मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे.
Hyundai Tucson : देशातील सर्वाधिक सुरक्षित गाड्यांच्या यादीत ह्युंदाई कंपनीची Tucson या गाडीचाही नंबर लागतो. या गाडीला सुद्धा फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे.
Mahindra BE 6 : महिंद्रा कंपनीच्या महिंद्रा BE 6 या गाडीला देखील Bharat NCAP मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे आणि ही SUV सुद्धा देशातील सर्वाधिक सुरक्षित गाड्यांच्या यादीत येते.
Mahindra XEV 9e : XEV 9e या गाडीला Bharat NCAP मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे ही कार देखील भारतातील सर्वाधिक सुरक्षित एसयूव्ही बनली आहे.
Skoda Kylaq : स्कोडाच्या या गाडीला Bharat NCAP मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे. म्हणून ही गाडी देखील देशातील सर्वात सुरक्षित गाड्यांच्या यादीत समाविष्ट आहे.
Kia Syros : Kia च्या Kia Syros ही गाडी देखील भारत एनसीएपीमध्ये फाईव्ह स्टार रेटिंगसह पास झाली आहे. म्हणून ही गाडी देखील सुरक्षित गाड्यांच्या यादीत ठेवली जाते.
Tata Nexon EV : या गाडीचे 45 kWh व्हेरीयंट सुद्धा या यादीत येते. या गाडीला सुद्धा फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे.
Maruti Suzuki Dzire (Gasoline) : ही मारुती सुझुकीची लोकप्रिय गाडी भारत एनसीएपीमध्ये फाईव्ह स्टार रेटिंगसह पास झाली आहे. म्हणून ही देशातील एक सुरक्षित गाडी बनली आहे.
Tata Harrier EV : या यादीत टाटा कंपनीची Harrier EV या गाडीचाही नंबर लागतो. या गाडीला सुद्धा Bharat NCAP मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे.
Toyota Innova Hycross : टोयोटा कंपनीची Innova Hycross ही एकमेव गाडी या यादीत आहे. या गाडीला क्रॅश टेस्टिंग मध्ये फाईव्ह स्टार रेटिंग देण्यात आली आहे.