पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही

पीपीएफ योजनेत गुंतवणूक करायची आहे का ? मग तुमच्यासाठी आजचा हा लेख फायद्याचा राहील. आज आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी काही टिप्स सांगणार आहोत.

Published on -

PPF Investment Tips : सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहात का ? मग, तुमच्यासाठी भारत सरकारची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना फायदेशीर ठरणार आहे. खरे तर गेल्या काही दिवसांच्या काळात देशभरातील बँकांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे.

अशा स्थितीत भारत सरकारची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते कारण की या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना अजूनही चांगले व्याज दिले जात आहे.

पण पब्लिक प्रॉब्लेम फंड मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी काही टिप्स फॉलो केल्या पाहिजे जेणेकरून त्यांना अधिकचा फायदा मिळू शकेल. आज आपण पब्लिक प्रॉब्लेम फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अशाच आठ टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे त्यांना आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही. 

PPF योजनेतील महत्त्वाच्या गोष्टी   

1) पीपीएफ ही एक सुरक्षित सरकारी बचत योजना असून या योजनेच्या कालावधी 15 वर्षांचा आहे. या योजनेत गुंतवणूक सुरू केल्यानंतर गुंतवणूकदार तिसऱ्या ते सहाव्या आर्थिक वर्षाच्या दरम्यान त्यांच्या ठेवींवर कर्ज सुद्धा घेऊ शकतात. ही सुविधा कमी व्याजदराने उपलब्ध आहे. सिबिल स्कोर कसाही असला तरी देखील या योजनेच्या गुंतवणूकदारांना कर्ज मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सातव्या वर्षापासून, पीपीएफच्या ग्राहकांना अंशतः पैसे काढता येणार आहेत.

2) पीपीएफ योजनेची दुसरी एक विशेषता म्हणजे या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा गुंतवणूकदारांना ही योजना पाच पाच वर्षांसाठी वाढवता येते. 

3) पीपीएफ योजना पंधरा वर्षांची आहे पण तुम्ही पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर यातून पैसे काढू शकतात. पण वेळेआधी पैसे काढण्यापासून वाचायला हवे यामुळे मॅच्युरिटीच्या वेळी कमी पैसे मिळतात. 

4) पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर कर सवलत मिळते. म्हणजे दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कलम 80 सी अंतर्गत गुंतवणूकदारांना कर सवलत दिली जाते. तसेच गुंतवणुकीवर मिळणारे व्याज पूर्णपणे करमुक्त असते आणि मुदतपूर्तीनंतर मिळालेल्या रकमेवर सुद्धा कोणताही कर लागत नाही. 

5) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत सतत गुंतवणूक करावी लागते. यामध्ये तुम्ही दरवर्षी किमान 500 रुपये आणि कमाल दीड लाख रुपये गुंतवता येतात. जर तुम्हाला यातून चांगला फायदा हवा असेल तर तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवायला हवी. या योजनेत कमाल तीन लाख रुपये गुंतवता येतात त्यामुळे तुम्ही वर्षाला दीड लाख रुपये गुंतवायला काही हरकत. जर तुम्ही या योजनेत दरवर्षी दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 40.68 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. 

6) जर एकरकमी रक्कम असेल तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 5 एप्रिलपूर्वी संपूर्ण रक्कम पीपीएफमध्ये जमा केल्यास गुंतवणूकदारांना अधिकचा फायदा मिळू शकतो. असे केल्याने तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी म्हणजेच 12 महिन्यांसाठी व्याज मिळू शकते. तसेच जर तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम जमा केली तर तुम्हाला दरमहा ठेवीच्या रकमेपुरतेच व्याज मिळणार आहे. पण जर तुम्ही नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्याकडील सर्व पैसे गुंतवले तर तुम्हाला अधिकचा फायदा मिळू शकणार आहे. 

7) पीपीएफ योजनेत जेवढी लवकर गुंतवणूक सुरू करता येईल तेवढे फायद्याचे ठरणार आहे. कारण की पीपीएफ योजनेत चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!