Smartphone Offer:- सध्या बाजारामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येते. त्यामध्ये बऱ्याच जणांना स्वतःला आवडत असलेला फोन खरेदी करण्याची इच्छा होते. परंतु बऱ्याचदा आवडत असलेल्या स्मार्टफोनची किंमत खूप जास्त असल्याने पैशांमुळे खरेदी शक्य होत नाही. अशावेळी जर स्मार्टफोनवर काही डिस्काउंट ऑफर आल्या तर त्याचा लाभ घेऊन आपल्या आवडत्या स्मार्टफोन खरेदीचे स्वप्न आपल्याला पूर्ण करता येते. अगदी याच प्रमाणे तुम्हाला देखील गुगल पिक्सेल 9 प्रो हा फोल्डेबल फोन खरेदी करण्याची इच्छा असेल व त्याच्या किमतीमुळे तुम्हाला आजपर्यंत तो घेता आला नसेल तर तो तुम्ही आता घेऊ शकणार आहात. कारण या फोल्डेबल स्मार्टफोनवर आता तब्बल 43 हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. चला तर मग आपण या लेखात याबद्दलची थोडक्यात माहिती बघू.
गुगल पिक्सेल 9 प्रो फोल्डेबल स्मार्टफोनवर मोठी सूट
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लॉन्च करण्यात आलेला गुगल पिक्सल 9 प्रो हा एक फोल्डेबल फोन असून त्यावर सध्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून 43 हजार रुपयांची मोठी सूट देण्यात येत आहे. ज्यांना हा फोन खरेदी करायचा होता परंतु त्याच्या जास्त किमतीमुळे तो त्यांना खरेदी करता येत नव्हता अशांसाठी ही ऑफर एक योग्य संधी आहे. या फोनमध्ये भन्नाट फीचर्स आणि एआय क्षमतांचा वापर करण्यात आलेला आहे. सध्या 1 लाख 72 हजार 999 रुपयाचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 1 लाख 29 हजार 999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच यावर 43 हजार रुपयाची सवलत सध्या देण्यात येत आहे.आणखी तुम्हाला पैशांमध्ये बचत करायची असेल तर तुमच्याकडे असलेला तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज देखील यामध्ये करू शकतात व यामध्ये तुमच्या जुन्या स्मार्टफोनची एक्सचेंज किंमत 55 हजार 850 रुपये पर्यंत तुम्हाला मिळणे शक्य आहे.

गुगल पिक्सेल 9 प्रो फोल्ड फोनची वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनचे जर वैशिष्ट्ये बघितली तर यामध्ये 6.3 इंच OLED बाहेरील पॅनल देण्यात आलेला आहे. त्याचा पिक्सल रेझोल्युशन 1080×2424 व रिफ्रेश रेट हा 120Hz असून 2700 चा निट्स पीक ब्राईटनेस आहे. तसेच उत्तम फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून या कॅमेऱ्यामध्ये ओआयएस सोबत 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर व 10.5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड आणि 10.8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आलेला आहे. इतकेच नाही तर आतील व बाहेरील अशा दोन्ही स्क्रीनवर दहा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील उपलब्ध आहे. या फोनमध्ये 4650mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे व यासोबत अनेक भन्नाट वैशिष्ट्ये उपलब्ध असून एआय आधारित वैशिष्ट्ये देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहेत.