जिओच्या ग्राहकांना धक्का! बंद करण्यात आला सर्वात स्वस्त 1GB डेली डेटा प्लॅन…आता ग्राहकांकडे पर्याय काय?

Published on -

Jio Recharge Plan:- भारतामधील जर प्रमुख टेलिकॉम कंपनी बघितली तर ती रिलायन्स जिओ असून भारतामध्ये सगळ्यात जास्त ग्राहक याच कंपनीचे आहेत. त्या मागोमाग व्होडाफोन आयडिया आणि एअरटेल सारख्या कंपनीचा नंबर लागतो. जिओ म्हटले म्हणजे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान ग्राहकांना देण्यासाठी प्रामुख्याने ओळखले जाते. मागील काही महिन्यांमध्ये जेव्हा एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सारख्या कंपन्यांनी रिचार्ज प्लानच्या किमतींमध्ये वाढ केली व त्यानंतर जिओने देखील बरेच रिचार्ज प्लानच्या किमतीत वाढ केली होती व तेव्हा ग्राहकांना मोठा धक्का बसला होता. परत धक्कादायक बातम्या अशी आहे की जिओने ग्राहकांना अतिशय परवडणारा सर्वात स्वस्त असलेला 1GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन सध्या बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता खूप मोठ्या प्रमाणावर झटका बसला आहे.

अवघ्या 209 आणि 249 रुपयांमध्ये ग्राहकांना हे प्लॅन उपलब्ध होते. यात 209 रुपयाचा जो काही प्लॅन होता त्याची वैधता 22 दिवस आणि 249 चा रिचार्ज प्लॅन होता त्याची वैधता 28 दिवसांची होती. त्यामध्ये अमर्यादित कॉलिंगचा फायदा ग्राहकांना मिळत होता आणि शंभर एसएमएस देखील फ्री होते. आता जर तुम्हाला 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीचा म्हणजेच वैधतेचा दैनिक डेटा प्लॅन घ्यायचा असेल तर तो 299 रुपयांचा घ्यावा लागेल. त्यामध्ये तुम्हाला 1.5GB डेली डेटा मिळेल.

आता जिओच्या ग्राहकांकडे पर्याय काय?

जिओने 249 आणि 209 रुपयांचे प्लॅन रद्द केल्यानंतर आता ग्राहकांना 1 जीबी दैनिक म्हणजेच डेली डेटा असलेला कुठलाही प्रीपेड प्लॅन सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकांना आता 239 रुपयांचा रिचार्ज करणे गरजेचे आहे. या प्लॅनची वैधता 22 दिवस असून यामध्ये ग्राहकांना 1.5GB डेटा तसंच अमर्यादित कॉलिंग आणि शंभर एसएमएस फ्री मिळतील. तसे पाहायला गेले तर 249 रुपयांपेक्षा हा प्लॅन स्वस्त आहे. परंतु त्याची वैधता सहा दिवसांनी कमी आहे. तसेच दुसरा प्लॅन 189 रुपयांचा असून यात एकूण 2GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे व त्यासोबत अमर्यादित कॉलिंग, 28 दिवसांची वैधता आणि त्यांचे एसएमएस मिळतील.

जे लोक कमीत कमी इंटरनेटचा वापर करतात त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. यामध्ये तिसरा प्लॅन हा 299 रुपयांचा असून यामध्ये ग्राहकांना 1.5GB डेटा तसेच अमर्यादित कॉलिंग व प्रत्येक दिवसाला शंभर एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता मिळेल. हा प्लॅन जरा महाग आहे परंतु यामध्ये दररोज 1.5GB डेटाचा लाभ ग्राहकांना मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe